Nagpur Accident | द बर्निंग कार! ताबा सुटल्याने डिव्हायडरवर आदळून पेटली कार; चालकाचा मृत्यू नेमका कसा झाला?

घरी जाण्याच्या घाईने सुसाट वाहन चालवित असाल, तर सावध व्हा. पाचगाव शिवारात वेगात असलेली कार अनियंत्रित झाली. डिव्हायडरला आदळल्यानं कारनं पेट घेतला. यात वाहनचालकाचा होरपळून मृ्त्यू झाला.

Nagpur Accident | द बर्निंग कार! ताबा सुटल्याने डिव्हायडरवर आदळून पेटली कार; चालकाचा मृत्यू नेमका कसा झाला?
नागपूर - पाचगावजवळ झालेल्या अपघातात कार पेटून चालकाचा मृत्यू झाला.
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 11:50 AM

नागपूर : जिल्ह्यातील उमरेडमधील वेकोली खदानमधील (Vekoli mine in Umred) कर्मचारी अशोक राऊत ड्युटीवरून नागपूरकडे परत येत होते. पाचगाव शिवारात त्यांचा कारवरील ताबा सुटला. गाडी अनियंत्रित होऊन डिव्हायडरवर (The vehicle went out of control on the divider) आपटली. कारचा वेग जास्त असल्याने कार आपटताच विरुद्ध दिशेने उसळून नाल्यात कोसळली. लागलीच कारने पेट घेतला.  कार नाल्यात आपटून चेंदामेंदा झाला. अशोक राऊत यांना त्यातून बाहेर न पडता आले नाही. पेटत्या कारमध्ये होरपळून त्यांचा मृत्यू (died in a car accident) झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. अपघातानंतर अनेकांनी त्यांना पेटलेल्या कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात कुणालाही यश आले नाही.

गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

अशोक राऊत हे उदासा येथील मूळचे रहिवासी. नागपुरातील पवनसुतनगर येथे राहत होते. उमरेड कोळसा खदानीत वाहनचालक होते. शुक्रवारी कामावर असताना छातीत दुखी लागल्याने त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर बरे वाटल्यानं त्यांनी घरचा रस्ता धरला, अशी माहिती आहे. प्रवासात त्यांचा गाडीवरून ताबा सुटला. गाडी डिव्हायडवर आदळली. यात होरपळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कुही येथे आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण माहीत होईल.

काचा फोडून वाचविण्याचा प्रयत्न

अपघात झाल्यानंतर अशोक यांना कसे बाहेर काढता येईल. यासाठी बाजूच्या लोकांनी प्रयत्न केले. कार पेटत असताना कारच्या काचा फोडण्यात आल्या. आतमध्ये होरपळणाऱ्या अशोक यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण, त्यात त्यांना यश आले नाही. कुही पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

न्यूड डान्स प्रकरणी उपसरपंच कारागृहात

दुसऱ्या घटनेत, डान्स प्रकरणी ब्राम्हणी येथील उपसरपंच रितेश विनोद आंबोने या आयोजकाला गुरुवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याची रवानगी शुक्रवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात केली. एसआयटी या प्रकरणाची चौकशी करत आहे. आतापर्यंत सोळा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. एलेक्स डान्स गृपमधील एक युवती अद्याप पसार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. एका पंचेवीस वर्षीय युवतीला अटक करण्यात आली आहे. अशाच प्रकारचा न्यूड डान्स मौदा तालुक्यातील भूगाव येथे झाला होता.

Nagpur NMC | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार का?, सामान्य कार्यकर्त्यांना काय वाटतं?

Nagpur Medical | मेडिकलमधील अद्ययावत कँसर हॉस्पिटलचे काय होणार?, बांधकामाचे 33 कोटी परत जाण्याच्या मार्गावर

WhatsApp group | आता व्हॅाट्सॲप ग्रुप ॲडमीनची ‘पॅावर’ वाढणार; म्हणजे मॅसेजबाबत नेमकं काय होणार?

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.