Video Nitin Gadkari : पाण्याच्या रंगीबेरंगी स्कीनवर दिसणार नागपूरचा इतिहास, जगातील सर्वात उंच फाउंटेन फुटाळ्यात, 34 मिनिटांच्या शोचे लवकरच प्रोग्रामिंग
या संगीत कारंजाच्या निर्मितीसाठी विश्वस्तरावरील आर्किटेक्ट नागपुरात आलेत. फाउंटेनच्या हार्डवेअरची प्राथामिक चाचणी गडकरी यांनी बघितली. नागपूरच्या प्रसिद्ध फुटाळा तलावात असणारे संगीत कारंजे नागपूरचा इतिहास सांगणार आहे. येणार्या काळात नागपूरला एक मोठे पर्यटनस्थळ बनविण्याचा मानस गडकरी यांनी व्यक्त केला.
नागपूर : फुटाळा तलावामध्ये बनत असलेल्या जगातील सगळ्यात मोठ्या फाउंटेनचं (Fountain) काम अंतिम टप्प्यात आहे. त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी पोहोचले. त्यांच्यासमोर या फाउंटेनचं प्रात्यक्षिक दाखविण्यात आलं. या फाउंटनचं लोकार्पण 15 ऑगस्टला केलं जाणार आहे. नागपूरच्या फुटाळा तलावात बनत असलेला हा फाउंटन जगातील सगळ्यात उंच आहे. या ठिकाणी फवारे संगीताच्या (Music) तालावर नाचणार आहेत. वेगवेगळ्या रंगसंगती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. याला गुलजार यांची कॉमेंट्री ए आर रहमान यांचं संगीत असणार आहे. हिंदीमध्ये अमिताभ बच्चन कॉमेंट्री करणार आहेत, तर मराठीमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) या ठिकाणी कॉमेंट्री करणार आहे. यासोबतच नागपूर शहरात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट करून शहराचा सौंदर्यीकरण वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जगातील सगळ्यात मोठे फाउंटन पाहण्यासाठी 4 हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी गॅलरी राहणार आहे. सोबतच बाजूच्या इमारतीमध्ये पार्किंग आणि रिवालविंग रेस्टॉरंटची व्यवस्थासुद्धा करण्यात आली. या कामासाठी लागत असलेला पैसा केंद्र आणि राज्य सरकारकडून दिला जात आहे. कुठलंही सरकार आलं तरी माझ्या कामांमध्ये पैशाची अडचण येत नाही, असं गडकरींनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ
फाउंटेनची काय आहेत वैशिष्टे
या प्रकल्पात कारंजाच्या हार्डवेअरची एकूण लांबी 180 मीटर्स इतकी आहे. पाण्याचा फवारा 50 मीटर उंच जाऊ शकतो व ही उंचीदेखील जगात कुठेही गाठता आलेली नाही. म्युझिकल फाउंटनच्या गॅलरीत चार हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. मागील बाजूस 12 माळ्यांची इमारत राहील. अकराशे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असेल. इमारतीत फूटपार्क, मॉल राहणार आहे. अकराव्या माळ्यावर मल्टिप्लेक्स राहणार आहे. इमारतीच्या बाराव्या मजल्यावर फिरते रेस्टॉरंट उभारणार आहे. बॉटनिकल गार्डनमध्ये समुद्राप्रमाणे चौपाटी उभारण्यात येईल. तेलंगखेडी बगीचाचे सौंदर्यीकरण व लँडस्केपिंग करण्यात येणार आहे. तिथूनही म्युझिकल फाउंटेनसाठी एन्ट्री असेल.
संगीत कारंजे सांगणार नागपूरचा इतिहास
फुटाळा येथील म्युझिकल फाउंटेन व लाईट शो प्रकल्पाची शुक्रवारी ट्रायल झाली. या प्रकल्पाचे लायटिंग व हार्डवेअरचे इन्स्टॉलेशन पूर्ण झाले आहे. या संगीत कारंजाच्या निर्मितीसाठी विश्वस्तरावरील आर्किटेक्ट नागपुरात आलेत. फाउंटेनच्या हार्डवेअरची प्राथामिक चाचणी गडकरी यांनी बघितली. नागपूरच्या प्रसिद्ध फुटाळा तलावात असणारे संगीत कारंजे नागपूरचा इतिहास सांगणार आहे. येणार्या काळात नागपूरला एक मोठे पर्यटनस्थळ बनविण्याचा मानस गडकरी यांनी व्यक्त केला.