Nagpur Police | नागपूर शहरात बेपत्ता होणाऱ्यांचे प्रमाण वाढले; पाच महिन्यांत दीड हजार बेपत्ता, पोलिसांनी तयार केला डेस्क
नागपूर शहरात बेपत्ता किंवा घर सोडून जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेणे आणि त्यांना घरापर्यंत पोहचविण्याचं काम पोलीस करत आहेत. त्यासाठी पोलिसांनी कंट्रोल रूममध्ये एक डेस्क सुद्धा तयार केला आहे.
नागपूर : कौटुंबिक कलह (Family quarrels), वाद-विवाद, प्रेम प्रकरण (love affairs) आणि इतर अनेक लहान मोठ्या कारणांनी आपले घर सोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हरवलेल्या लोकांची वाढलेली ही आकडेवारी पोलिसांची चिंता ( police concerns) वाढवणारी आहे. 1 जानेवारी ते 31 मे या केवळ पाच महिन्यांच्या कालावधी नागपूर शहराच्या विविध भागातून तब्बल 1 हजार 529 लोक हरवले किंवा घर सोडून पलायन केले. यामध्ये 718 महिला तर 657 पुरुषांचा समावेश आहे. एवढचं नाही तर याच काळात 154 अल्पवयीन मुले आणि मुली देखील बेपत्ता झाले आहेत. या सर्वांच्या कुटुंबियांनी हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तेवढ्याचं तत्परतेने तपास करून 82 टक्के लोकांना शोधून काढले.
कंट्रोल रुममध्ये एक डेस्क
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात घर सोडून जाणाऱ्यांची संख्या आणि हरवलेल्या नागरिकांची संख्या कमी झाली होती. मात्र, यावर्षी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधी एकूण 1 हजार 529 नागरिक हरवले किंवा घर सोडून निघून गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात दाखल आहे. नागपूर शहरात बेपत्ता किंवा घर सोडून जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेणे आणि त्यांना घरापर्यंत पोहचविण्याचं काम पोलीस करत आहेत. त्यासाठी पोलिसांनी कंट्रोल रूममध्ये एक डेस्क सुद्धा तयार केला आहे. उर्वरित 23 बालकांचा आणि महिला पुरुषांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. येत्या काळात ही मोहीम आणखी प्रभावी पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अशी माहिती शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
तरुणांना समजून घ्या
इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी घर सोडून जाण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने प्रेम विवाह, कौटुंबिक वाद, नैराश्य, मानसिक संतुलनाने ग्रासलेले, आई-वडिलांच्या दबावाला कंटाळलेले, आजारपण, सासरकडून होणारा छळ, मनासारख्या क्षेत्रात काम करू न देणे, यासह विविध कारणे आहेत. प्रेमसंबंधाचे कारणाने सुद्धा अनेक जोडपे घर सोडून बाहेर पडत असल्याचे कारण आढळते. यासाठी पालकांनी तरुण मुलांना व मुलींना सोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांच्या भावनाही समजून घेणे गरजेचे आहे.