Gondia | लघवीला गेलेल्या पाहुणीवर अंधारात काळ, जंगलात नेऊन सहा नराधमांचा बलात्कार; सर्व आरोपींना अखेर जन्मठेप
आरोपींना 20 वर्षे कारावास व प्रत्येकी 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास व 500 रुपये दंड ठोठावण्यात आला. यातील राकेश गणपत नेताम या आरोपीला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले.
नागपूर : कोरची ( Korchi) तालुक्यातील एक महिला लग्नासाठी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड तालुक्यातील (Chichgad) धमदीटोला येथे आली होती. लघवीला गेली असता सात जणांनी तिला उचलून जंगलात नेले. तिथं अंधारात पीडितेवर अत्याचार केला होता. याप्रकरणी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयानं सहा आरोपींना जन्मठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावली.
अंधारात जंगलात नेऊन अत्याचार
गडचिरोलीतील भडगावची 32 वर्षीय महिला धमदीटोल्यात आली होती. धमदीटोला हे गाव गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. 19 एप्रिल 2014 ला तिच्या मावसबहिणीचे लग्न होते. मंडप पूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी ती लघवीला गेली. अंधारात आरोपींनी उचलून तिला जंगलात नेले. तिथं सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पीडितेच्या तक्रारीनंतर चिचगड पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला.
25 हजारांचा दंड न भरल्यास सहा महिने कारावास
या सामूहिक बलात्कार प्रकरणी धमनीटोला येथील चरणदास इंदुरू बखर (42 वर्षे), हरिचंद महासिंग बागडेरिया (47 वर्षे), बंसीलाल रामदास थाटमुर्रा (45 वर्षे), संतोष समीलाल मडावी (40 वर्षे), लेखराम गेहरू कोराम (30 वर्षे), राम मुकुंद घाटघुमर (30 वर्षे) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींना 20 वर्षे कारावास व प्रत्येकी 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास व 500 रुपये दंड ठोठावण्यात आला. यातील राकेश गणपत नेताम या आरोपीला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला. सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. खान यांनी केली आहे.