नागपुरात ओव्हरटेकचा नाद जीवावर बेतला; गुमगावच्या नवविवाहित दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाला. दुचाकीने ओव्हरटेक करत असताना ही घटना घडली. त्यामुळं वाहन चालविताना सावध राहिले पाहिजे. अन्यथा होत्याचं नव्हतं होण्यास वेळ लागणार नाही.

नागपुरात ओव्हरटेकचा नाद जीवावर बेतला; गुमगावच्या नवविवाहित दाम्पत्याचा अपघाती मृत्यू
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 11:09 AM

नागपूर : गुमगावच्या हिमांशू देवानंद राऊत आणि निकिता यांचे एक महिन्यांपूर्वी लग्न झाले. तो बावीस वर्षांचा तर निकिता एकवीस वर्षांची होती. एकोणतीस जानेवारीला दोघेही काही कामानिमित्त दुचाकीने तारसी येथे (By bike to Tarsi) जात होते. रुईखैरी शिवारातील हैद्राबाद-नागपूर मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नागपूर हैद्राबाद या मार्गाने (By way of Nagpur Hyderabad)एकतर्फा वाहतूक आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास हिमांशू आणि निकिता हे जलसा ढाब्याजवळ पोहचले. हिमांशूने पुढील वाहनास ओव्हरटेक (Overtake the vehicle) करण्याचा प्रयत्न केला. विरुद्ध दिशेने एक ट्रेलर दिसल्याने हिमांशूचे दुचाकीवरील संतुलन बिघडले. ट्रेलर चालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, हिमांशूची गाडी सुसाट असल्यानं दुचाकी ट्रेलरवर धडकली. त्यात ते दोघेही गंभीररित्या जखमी झाले.

रस्ता दुरुस्तीचे काम होते सुरू

रस्ता दुरुस्तीचे काम बघणाऱ्या ओरिएंटल कंपनीच्या टोल प्लाझावरील मेडिकल टीमने घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना घेऊन बुटीबोरी येथील खासगी रुग्णालय गाठले. बुटीबोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी हिमांशूला मृत घोषित केले. निकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला. तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत. याप्रकरणी अमीरलाल लखनलाल सेन यांनी तक्रार दिली.

तारसी येथे जात होते नातेवाईकांकडे

हिमांशू हा डेकोरेशनच्या कामावर जात होता. आठवडी बाजारात भाजीपाला विकत होता. मिळेल ते रोजंदारीचे काम करीत होता. हिमांशूचे आई-वडील शेतमजूर आहेत. तो घरात सर्वात मोठा होता. लग्नाच्या दोन-तीन दिवसानंतरच त्याने नवीन दुचाकी खरेदी केली होती. त्याच दुचाकीने पत्नीला घेऊन बोरखेडी नजीकच्या तारसी येथील आत्याच्या मुलीला भेटायला जात होता. दरम्यान झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. दुचाकी चालविताना काळजी घेणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असतात. अशावेळी वाहन हळू चालविले पाहिजे. अन्यथा अपघातास आमंत्रण दिले जाते. ही घटना अशीच घडली. दोघांच्याही सुखी कुटुंबाची राखरांगोळी झाली. जी स्वप्न त्यांनी लग्नापूर्वी पाहिली त्यांचा चुराडा झाला.

तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार; नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना होणार लाभ?

कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.