Mahatma Phule | तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रात, चंद्रपुरातील लोकजागृती संस्था सादर करणार प्रयोग

बहुजनांचा प्रश्न मांडून शिक्षणाचे महत्त्व महात्मा फुले यांनी या नाटकात अधोरेखित केले. सामाजिक परिवर्तनाचा उद्देश समोर ठेवून त्यांनी हे नाटक रचले आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक मराठी रंगभूमीचे जनक ठरतात, असं मत लोकजागृती संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी व्यक्त केले.

Mahatma Phule | तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रात, चंद्रपुरातील लोकजागृती संस्था सादर करणार प्रयोग
तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रातImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 5:00 AM

नागपूर : समग्र सामाजिक क्रांतीचे अग्रदुत क्रांतिसूर्य महात्मा फुले ( Mahatma Phule) यांच्या लेखणीतून साकारलेले तृतीय रत्न (Tritiya Ratna) नाटक नाट्यसृष्टीच्या आजपर्यंतच्या इतिहासात रंगमंचावर आणण्याचे धाडस करण्यात आले. हे धाडस परिवर्तनाच्या प्रबोधन चळवळीत सदैव सक्रिय असलेले सुप्रसिद्ध अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे. महात्मा फुले लिखित तृतीय रत्न नाटक प्रथमच अनिरुद्ध वनकरांच्या निर्मितीत व दिग्दर्शनामध्ये 10 एप्रिलपासून पुणे येथे पहिला प्रयोग सादर होईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सादरीकरणाला सुरुवात होत आहे. 1855 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे नाटक मराठी रंगभूमीवरील फार मोठे योगदान होते. हे नाटक इंग्रज राजवटीमध्ये महात्मा फुलेंनी सादर करण्याचा प्रयत्न केला असता ते त्यावेळी सादर होऊ देण्यात आले नाही. त्यानंतर प्रथमच  हे नाटक सादर केले जाणार आहे. अशी माहिती अभिनेते व दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर (Aniruddha Vankar) यांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसांपासून तालीम

तृतीय रत्न नाटकाची नागपूर येथे मागील 15 दिवसांपासून जोरदार तालीम सुरू आहे. या नाटकाची निर्मिती चंद्रपूरच्या लोकजागृती या संस्थेची आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अनिरुद्ध वनकर, प्रा. डॉ. शेखर डोंगरे, संजीव रामटेके, मंगेश मेश्राम, नागसेन गायकवाड, अरविंद खंदारे, रूपेश मेश्राम, आकाश डांगे, चंद्रकांत तोरणे, करण गुडेवार, अविनाश बोना, अभिनेत्री दीपाली बडेकर, शुभांगी राऊत, रूपाली खोब्रागडे, रंजू वैद्य यांच्यासह इतरही कलावंत नाटकात भूमिका साकारणार आहेत. सेट, कास्ट्यूम व  क्रिएटिव्ह हेड म्हणून  प्रा. संगीता टिपले संपूर्ण जबाबदारी पार पडणार आहेत. प्रकाश योजना प्रा. शिवप्रसाद गौड नई दिल्ली यांचे असणार आहे.

सामाजिक परिवर्तनाचा उद्देश

नाटक म्हणजे मनोरंजन, असे सर्वसाधारणपणे म्हटले जात असले तरी महात्मा ज्योतिबा फुले यांचा काळ आणि तेव्हाचे समाजमन लक्षात घेता नाटकातून होणाऱ्या प्रबोधनाला महत्त्व होते. वैचारिक व सामाजिक दृष्टिकोनातून आणि प्रबोधनाची कास धरत समाजाच्या अंतर्मनात पोहोचण्यासाठी त्यांनी तृतीय रत्न हे नाटक बांधले. याच नाटकाने सामाजिक रंगभूमीचा पाया रचला असे म्हटले जाते. महात्मा फुले यांची वैचारिक दृष्टी या नाटकात कलात्मकदृष्ट्या व्यक्त होते. कलेचा कृतिपूर्ण उद्देश या नाटकातून दिसून येतो.

Nagpur | स्वच्छ भारत अभियान; नागपुरात ओल्या कचऱ्याची जागीच प्रक्रिया स्पर्धा, सहभागी होण्याचे आवाहन

Video Buldana Fire | बुलडाण्यात साई मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान

Video Chhagan Bhujbal on ED | ईडी हा राक्षसी कायदा, अकोल्यात छगन भुजबळ यांनी व्यक्त केली चिंता

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.