विरोधकांवर आरएसएस सरसंघचालकांनी साधला निशाणा; म्हणाले रामलल्लांच्या…
RSS Mohan Bhagwat | 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्ला विराजमान होत आहे. या अभूतपूर्व सोहळ्यापूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्याच्या संघर्षाची पार्श्वभूमी विषद केली. आक्रमणकर्त्यांचा मंदिर तोडण्यामागील हेतू काय होता, याची भूमिका मांडली, काय म्हणाले भागवत...
नागपूर | 21 January 2024 : सोमवारी, 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होत आहे. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या इतर संघटनांनी सक्रिय भूमिका निभावली. रामजन्मभूमीत मंदिर उभारणीसाठी या संघटनांनी संघर्ष केला तर साधू मंहतांनी प्रदीर्घ न्यायालयीन लढली. उद्याच्या अभूतपूर्व सोहळ्यानिमित्त या सर्व आठवणींना उजळा देतानाच, आक्रमणकर्त्यांची मंदिर पाडण्यामागील नेमका हेतू काय होता, यावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांची भूमिका मांडली. नेमके काय म्हणाले सरसंघचालक?
हे तर समाजाला निरुत्साही करण्याचे षडयंत्र
भारताचा इतिहास दीड हजार वर्षापासून विरोधकांच्या संघर्षाचा इतिहास आहे.प्रारंभिक काळात लूटपाट करणे आणि आपलं राज्य स्थापन करणे असा आक्रमणकर्त्यांचा उद्धेश होता, असे भागवत यांनी मत मांडले. इस्लामच्या नावावर पश्चिम मधून आक्रमण करून पूर्ण विनाश करण्यात येत होता यातूनच अनेक मंदिर नष्ट करण्यात आली होती.या मागचा उद्देश भारताला आणि इथल्या समाजला निरुत्साही करण्याचा होता. अयोध्येमधील राम मंदिरचा विध्वंस सुद्धा याचाच एक भाग होता. आक्रमण करणाऱ्यांचा उद्देश फक्त अयोध्येतील राम मंदिर एवढाच नव्हता तर संपूर्ण विश्वामध्ये मंदिर नष्ट करण्याचा होता, असे ते म्हणाले.
भारतीय शासकांनी अक्रमण केली नाहीत
भारतीय शासकांनी अशा प्रकारे कुठली आक्रमण केली नाहीत, परंतु विश्वातले अनेक शासक यांनी आपले राज्य विस्तार साठी अशी आक्रमक आणि कृत्य केली आहे. परंतु त्यांच्या अपेक्षांचा परिणाम भारतावर होऊ शकला नाही जी त्यांची अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही, असे ते म्हणाले.
श्रीराम सर्वांचेच आराध्य दैवत
अयोध्येतील श्रीरामाच्या जन्मस्थळावर मंदिर बांधण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्यात आले. यात अनेक संघर्ष युद्ध आणि बलिदान सुद्धा द्यावे लागले. राम जन्मभूमी हा मुद्दा हिंदूंच्या मनात घर करून बसला. धार्मिक दृष्टिकोनातून श्रीराम बहुसंख्य समाजाचे आराध्य दैवत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विरोधकांचे टोचले कान
प्रभू श्रीराम हे बहुसंख्य समाजाचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्याला विनाकारण विरोध करु नका. हे आता तरी संपायला हवे. यामध्ये निर्माण झालेला दुरावा दूर झाला पाहिजे . समाजातील प्रबुद्ध लोकांनी हे अवश्य पाहिलं पाहिजे की हा वाद विवाद पूर्णता समाप्त कसा होईल, असे आवाहन त्यांनी केले.