मुकेश अंबानी यांचा अँटालिया, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी; निनावी फोनने पोलिसांची झोप उडवली

दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी 25 सशस्त्र लोक मुंबईतील दादरला पोहोचणार आहेत, अशी धमकीही निनावी फोन करणाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे.

मुकेश अंबानी यांचा अँटालिया, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी; निनावी फोनने पोलिसांची झोप उडवली
mukesh ambaniImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 7:01 AM

नागपूर : नागपूर पोलीस कंट्रोलला काल एक फोन आला आणि सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने थेट मुंबईतील प्रसिद्ध लोकांची घरेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, बिग बी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या फोन नंतर नागपूर पोलीस अलर्ट झाले असून फोन करणाऱ्या इसमाचा शोध गेत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांचा अँटालिया बंगला उडवून देण्याची धमकी दिली आहे. तसेच अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगलेही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा फोन आल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून फोन करणाऱ्याचा कसून शोध घेत आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर पालघरमधून हा फोन आल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण?

एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केला. मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावण्यात आल्याचं म्हटलं. त्यानंतर नागपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलीस तात्काळ सतर्क झाली. मुंबई पोलिसांच्या बॉम्ब निरोधक पथकाने तात्काळ तिन्ही ठिकाणी जाऊन तपासणी केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी 25 सशस्त्र लोक मुंबईतील दादरला पोहोचणार आहेत, अशी धमकीही निनावी फोन करणाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे. हे लोक कधी मुंबईत पोहोचणार आहेत. ते कुठे कुठे हल्ले करणार आहेत. याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस चक्रावून गेले असून पोलिसांनी फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली आहे.

दोन वर्षापूर्वी दोघे अटकेत

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या घरी आणि तीन रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी 2021मध्ये पोलिसांनी दोन लोकांना अटक केली होती. या आरोपींना ठाण्यातून अटक करण्यात आली होती. तर, 2021मध्येच मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बंगल्याबाहेर 20 जिलेटिन स्टिक असलेली एक कार आढळली होती. यावेळी एक नोट सापडली होती. त्यावर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आळी होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सध्या हे प्रकरण एनआयए हाताळत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.