Nagpur Crime | नागपुरातील कुख्यात गुंडाच्या नावाने धमकी, व्यापाऱ्याकडून खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
तीन आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. या प्रकरणाचा तपास सक्करदरा पोलिसांनी केला. यात आरोपी हा अबूचा दूरचा नातेवाईक असल्याचं समजलं. पण, अशाप्रकारे खंडणी मागत असल्यानं व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते. आता आरोपींना अटक केल्यानं त्यांची भीती थोडीफार कमी झाली.
नागपूर : फिर्यादी हा जुन्या टायरचा व्यवसाय (Tire Business) करतो. त्याचा व्यवसाय चांगला चालत असल्याने त्याची चर्चा होती. त्यामुळे आरोपीनी त्याच्याकडून खंडणी वसूल (Ransom Collection) करण्याचं ठरविलं. मै अबू का भांझा बोल राहा हूँ तेरा धंदा अच्छा चल रहा, तू हमे हप्ता दे असं म्हणत फोन केला. मात्र त्याने नकार दिला असल्याने आरोपीने त्याच्यावर हल्ला केला. त्याला चाकूने जखमी केलं. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तीन आरोपींना अटक (Accused Arrested) केली. त्यातील एक अल्पवयीन आरोपी आहे. पोलिसांच्या तपासात पुढे आलं की आरोपी हा अबूचा दूरचा नातेवाईक असू शकतो. मात्र पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहे. अशी माहिती सक्करदराचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली. एखाद्या गुंडाचं नाव सांगून अश्याप्रकारे खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणाची जोरात चौकशी सुरू केली आहे.
काय आहे प्रकरण
नागपुरातील कुख्यात गुंड अबूच्या नावाने धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना सक्करदरा पोलिसांनी अटक केली. यामध्ये एक अल्पवयीन आहे. तक्रार करणाऱ्याचा जुन्या टायरचा व्यवसाय आहे. तो चांगला चालत होता. त्याच्याकडं पैशे येतात हे गुंडांना माहीत झाले. त्यामुळं त्याच्याकडून हप्ता वसुली करण्याचा आरोपींनी बेत आखला. पण, त्यात ते यशस्वी झाले नाही. प्रकरण पोलिसांत पोहचले. पोलिसांनी तिघांना बेड्या घातल्या.
आरोपी अबूचा दुरचा नातेवाईक
तीन आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. या प्रकरणाचा तपास सक्करदरा पोलिसांनी केला. यात आरोपी हा अबूचा दूरचा नातेवाईक असल्याचं समजलं. पण, अशाप्रकारे खंडणी मागत असल्यानं व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते. आता आरोपींना अटक केल्यानं त्यांची भीती थोडीफार कमी झाली.