Nagpur | तीन लाखांचा नायलॉन मांजा जप्त, विक्रीवर बंदी तरीही बाजारात कसा?

मकर संक्रांत जवळ यायला सुरवात होताच मोठ्या प्रमाणात अवैध नायलॉन मांजा नागपुरात यायला सुरवात झाली. नागपूर पोलिसांनी एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून येणार जवळपास तीन लाख रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला.

Nagpur | तीन लाखांचा नायलॉन मांजा जप्त, विक्रीवर बंदी तरीही बाजारात कसा?
नागपूर - जप्त करण्यात आलेल्या नायलॉन मांजासह पोलीस.
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 1:28 PM

नागपूर : नायलॉन मांजी हा जीवघेणा आहे. यापूर्वी कित्येकांचे जीव या मांजानं घेतले आहेत. नियमानुसार याच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध आहेत. तरीही खरेदी विक्री होताना दिसते. मनपा आणि पोलीस प्रशासनानं नायलॉन मांजाविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.

मकर संक्रांत जवळ यायला सुरवात होताच मोठ्या प्रमाणात अवैध नायलॉन मांजा नागपुरात यायला सुरवात झाली. नागपूर पोलिसांनी एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून येणार जवळपास तीन लाख रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला.

नायलॉन मांजा विक्रीवर बंदी

राज्यात नायलॉन मांजाच्या वापरावर आणि विक्रीवर बंदी आहे. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होत असतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा अवैधरित्या शहरात येत आहे. मात्र, पोलिसांनी आता त्यावर कंबर कसली आहे. मोठी कारवाई सुरू केली आहे. तहसील पोलीस स्टेशन हद्दीत ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचत ट्रान्सपोर्टमधून सगळा मांजा जप्त करत कारवाई केली.

पोलिसांनी कसली कंबर

या आधीसुद्धा अशाप्रकारे कारवाई करत मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त करत कारवाई करण्यात आली, असल्याची माहिती डीसीपी गजानन राजमाने यांनी दिली. नागपुरात अवैध मांजाची विक्री होऊन त्याचा वापर होऊ नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली. त्यासाठी जनतेला सुद्धा पोलिसांनी आवाहन करत अवैध मांजा विक्री होत असल्यास माहिती देण्याचं आवाहन केलंय.

47 पतंग दुकानांची तपासणी

नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. 16 डिसेंबर) रोजी 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने 34 प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. तसेच पथकाने 10 झोन मधील 47 पतंग दुकानांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Vedio – Nagpur | इंटर्नशीपच्या काळातील शिकवणी शुल्क रद्द करा, व्हेटरनरी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

NMC | नागपूर मनपात 67 लाखांचा स्टेशनरी घोटाळा!; सहा जणांना नोटीस, वित्त व लेखा अधिकाऱ्यांचा समावेश

Nagpur | नायलॉन मांजावरील बंदी : काय उपाययोजना केल्या?; उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.