Nagpur corona | दोन दिवसांत वीस मृत्यू, सात हजारांवर रुग्णांची भर; नागपुरातील कोरोनास्थिती काय?

आता 736 मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. यावर खर्च होत असला तर व्यवस्था असणे गरजेचे आहे. ती व्यवस्था करून ठेवण्यात आली असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव जयस्वाल यांनी सांगितलं.

Nagpur corona | दोन दिवसांत वीस मृत्यू, सात हजारांवर रुग्णांची भर; नागपुरातील कोरोनास्थिती काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 1:37 PM

नागपूर : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस अधिकच गडद होतोय. आता दैनंदिन बाधितांसोबतच मृतांच्याही संख्येत चांगलीच वाढ होतेय. प्रशासनाच्याही चिंता वाढल्या आहेत. गेल्या 48 तासांत नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू (Corona Death) झालाय. नव्याने 7096 जणांचेच अहवाल सकारात्मक (corona position) आढळलेत. यादरम्यान 7 हजार 826 जण ठणठणीत होऊन घरीही परतलेत. एकूणच जिल्ह्यातील बाधितांची व बळींची संख्या ही नागपूरकरांसोबतच प्रशासनालाही चिंतेत (The administration is also concerned) टाकणारी अशी आहे. जिल्ह्यात बुधवारी 26 जानेवारीला 11 हजार 509 चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये शहरात 8627 व ग्रामीणमध्ये 2882 चाचण्यांचा समावेश आहे. त्यापैकी शहरातून 2928, ग्रामीणमधून 1176 व जिल्ह्याबाहेरील 121 अशा 4 हजार 225 जणांचे अहवाल सकारात्मक आढळलेत.

26 ला 6, तर 27 ला 14 कोरोना मृत्यू

गुरुवारी 27 जानेवारीला शहरात 5910 व ग्रामीणमध्ये 1760 अशा जिल्ह्यात केवळ 7 हजार 679 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी शहरातून 2027, ग्रामीणमधून 755 व जिल्ह्याबाहेरील 89 अशा 2871 जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. 26 जानेवारी रोजी जिल्ह्यात 6 कोरोनाबळींची नोंद झाली. यामध्ये शहरातील 5 व जिल्ह्याबाहेरील एका मृताचा समावेश आहे. तर 27 जानेवारी रोजी 14 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील 10 आणि जिल्ह्याबाहेरील 4 जणांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 10 हजार 203 वर पोहोचली आहे.

दीडपट ऑक्सिजनची व्यवस्था

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनीच जाणले. यामुळे तिस-या लाटेचा धोका ओळखून कोट्यवधी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभे करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट भयावह ठरली. या लाटेत एका रुग्णास दर मिनिटाला कमीतकमी दहा तर जास्तीतजास्त सत्तर लीटरपर्यंत ऑक्सिजन लागत होता. 95 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली होती. यामुळे मोठा तुटवडा पडला. इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्याची वेळ आली. पुन्हा तीच स्थिती निर्माण होऊ नये म्हणून नागपूर विभागात पीएसएचे 26 प्लांट निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर जिल्ह्याचा विचार दुसऱ्या लाटेत जेवढ्या ऑक्सिजनची आवश्यकता होती त्यापेक्षा दीडपट जास्त ऑक्सिजनची व्यवस्था करून ठेवण्यात आली. दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्यात 445 मेट्रिक ऑक्सिजनची आवश्यकता होती. त्यामुळे आता 736 मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. यावर खर्च होत असला तर व्यवस्था असणे गरजेचे आहे. ती व्यवस्था करून ठेवण्यात आली असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव जयस्वाल यांनी सांगितलं.

Kids Video : ‘हा’ चिमुरडा शिडीवरून असा काही उतरतो… यूझर्स म्हणतायत, याला ऑलिम्पिकच्या तयारीला पाठवा

Video : …हा तर दुकानदाराचाही बाप निघाला! काय घडलं पाहा; मग म्हणाल, शेवटी ग्राहकच असतो राजा..!

Viral Video : मुलगा मगरीला खाऊ घालत होता खाद्य आणि अचानक…

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.