Nagpur Crime | रेल्वेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक, नागपुरातील जरीपटक्यात गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक
28 जून 2018 रोजी जोसना देशभ्रतार यांना त्यांच्या राहत्या घरी 50 हजार रुपयेचा धनादेश दिला. त्यानंतर प्रशांतने अमोलला जोसना देशभ्रतार यांच्या घरी रेल्वेचे अपॉइंटमेंट लेटर दिले. तीन सप्टेंबर 2018 रोजी प्रशांत जायनिंग लेटर आणून दिले. मेडिकल व ट्रेनिंगसाठी जावे लागणार असल्याचे सांगितले.
नागपूर : नोकरी आज प्रत्येकाची गरज आहे. मात्र याचा फायदा काही भामटे उचलतात आणि बेरोजगारांची फसवणूक करतात. असाच एक प्रकार नागपुरात घडला. रेल्वेत ( Railways) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका सुशिक्षित बेरोजगाराची अडीच लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. 2018 साली झालेल्या या प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अमोल साखरे (Amol Sakhare) यांनी जरीपटका पोलीस (Jaripatka Police) ठाण्यात धाव घेतली. वैशालीनगर येथील रहिवासी अमोल साखरे (वय 30 वर्षे) हे 2018 साली बेरोजगार होते. नोकरीसाठी भटकत असताना मित्र लक्ष्मीकांत लोखंडे यांच्या माध्यमातून प्रशांत मारशेट्टीवार याच्याशी ओळख झाली. माझी रेल्वेत ओळखी असून, तुला देखील रेल्वेत नोकरी लावून देतो. यासाठी सात ते आठ लाख रुपये लागतात. नोकरीची आवश्यकता असल्याने अमोलने दोन लाख रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले.
अशी झाली फसवणूक
28 जून 2018 रोजी जोसना देशभ्रतार यांना त्यांच्या राहत्या घरी 50 हजार रुपयेचा धनादेश दिला. त्यानंतर प्रशांतने अमोलला जोसना देशभ्रतार यांच्या घरी रेल्वेचे अपॉइंटमेंट लेटर दिले. तीन सप्टेंबर 2018 रोजी प्रशांत जायनिंग लेटर आणून दिले. मेडिकल व ट्रेनिंगसाठी जावे लागणार असल्याचे सांगितले. उर्वरित साडेपाच लाख रुपये दिल्यावरच टीसी कीट मिळेल. जॉईन करता येईल, असे प्रशांतने सांगितले. परंतु हाती जायनिंग लेटर असल्याने अमोलने उर्वरित रक्कम दिली नाही. ते पत्र खोटे निघाल्यावर जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार केली.
दोन आरोपींना अटक
अमोल साखरे यांनी तक्रार दिली. त्यानुसार, रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून त्यांना सात-आठ लाख रुपयांची मागणी प्रशांत मारशेट्टीवार यांनी केली. दोन लाख रुपये घेतले. याप्रकरणी पोलिसांनी प्रशांतला अटक केली. दोन आरोपी आहेत. नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जरीपटक्याचे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार तपास करत आहेत. नोकरी हा प्रत्येक युवकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. मात्र हे सगळं करत असताना विचारपूर्वक करणे गरजेचे आहे.