Nagpur Crime | गुंडांच्या दोन गटात मारहाण, नागपुरात रात्री अपहरणाचा थरार; पुढे आरोपी आणि मागे पोलिसांचा ताफा

नागपूरच्या जरीपटका भागातून गुन्हेगारांचे अपहरण करण्यात आले. नंदनवनमध्ये तो जखमी अवस्थेत सापडला. प्रभू इलमकर असं अपहरण झालेल्याचं नाव आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Nagpur Crime | गुंडांच्या दोन गटात मारहाण, नागपुरात रात्री अपहरणाचा थरार; पुढे आरोपी आणि मागे पोलिसांचा ताफा
जरीपटका पोलीस ठाणे
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 9:36 AM

नागपूर : कुशीनगरचा राज प्रभू इलमकर (Raj Prabhu Ilamkar) हा गूंड प्रवृत्तीचा आहे. त्याचे दोन दिवसांपूर्वी एका युवकाशी भांडण झाले. मंगळवारी बाजारात बुधवारीही चांगलेच कडाक्याचे भांडण झाले. राज आणि दुसरा युवक यांनी एकमेकांना मारहाणही (Beating each other) केल्याची माहिती आहे. या घटनेमुळं राजचे विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी राजचा संपविण्यासाठी प्लॅन आखला. आठ ते दहा जण ऑटोने राजच्या घरी गेले. रात्री आठच्या दरम्यान त्याला घरी शोधले. परंतु, राज घरी नव्हता. त्यामुळं आरोपी आणखी संतापले. राजच्या घरी तोडफोड केली. कुठे गेला राज म्हणून घरच्यांना विचारणा केली. त्यानंतर ते ऑटोसह दयानंद पार्कजवळ (Dayanand Park with auto) पोहचले. राजला चाकूचा धाक दाखवला. राजला घेऊन आरोपी पसार झाले. खुलेआम घटना घडल्याने उपस्थित नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

गूंड समोर, पोलीस मागे

झोन पाचचे डीसीपी मनीष कलवानिया यांच्या नेतृत्त्वात तपास सुरू झाला. राजचा मोबाईल ट्रेस करण्यात आला. पन्नास पोलिसांची चमू कामाला लागली. राजचा पाठलाग करू लागले. राजला जरीपटक्यावरून पाचपावलीच्या दिशेन आरोपी घेऊन जात होते. बडकस चौक, कोतवाली, गंगाबाई घाट मार्गाने केडीके कॉलेज चौकात राजला घेऊन आरोपी पोहचले. तिथं नाल्याच्या झुडपात घेऊन गेले. पोलीस पाठलाग करीत होते. त्यामुळं आरोपी पळाले. शेवटी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

गुंडांना भीती राहिली नाही का?

जखमी राजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस आरोपींचा शोध घेत होते. या थरारक घटनेनं नागपूर हादरले आहे. गूंड प्रवृत्ती वाढत असून खुलेआम अपहरणाच्या घटना घडत आहेत. त्यामुळं गुंडांना भीती राहिली नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी तत्काळ दखल घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली. रात्री घडलेल्या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

नागपुरात सफाई मजुरांच्या वारसदारांना तोहफा, महापालिकेतर्फे नोकरीच्या नियुक्तीचे प्रमाणपत्र, किती जणांना लाभ?

नागपुरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; दिल्ली पासिंग कारमधून तस्करी, सिटच्या खाली ठेवला गांजा

Nagpur BJP | काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच भाजपचे कार्यकर्ते सज्ज, नागपुरात एकमेकांविरोधात घोषणाबाजी

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...