Nagpur | वणीतील खाणीतून दोन ट्रक कोळशाची तस्करी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बोलणे का टाळले?

ती चोरी पकडल्यावरसुद्धा सर्वांनी हात वर केले. याहीवेळी असेच काहीतरी होण्याची शक्यता आहे. अशावेळी केंद्रीय मंत्र्यांनी यावर बोलणे आवश्यक होते. पण ते काही बोलले नाहीत.

Nagpur | वणीतील खाणीतून दोन ट्रक कोळशाची तस्करी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बोलणे का टाळले?
नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना रावसाहेब दानवे.
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 9:13 AM

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखली जाते. तालुक्यातील उकणी कोळसा खाणीतून दोन ट्रक कोळसा चोरण्याचा प्रयत्न झाला. जवानांच्या सतर्कतेने ही बाब उजेडात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा रावसाहेब दानवे म्हणाले, अशा प्रश्‍नांसाठी ही पत्रकार परिषद नाही. दानवे यांनी कोळसा चोरीच्या विषयावर स्पष्टपणे नकार दिला. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी नागपुरातील वेकोलीच्या मुख्यालयाला (Vekoli Headquarters) भेट दिली. या प्रकरणात मोठे मासे संशयित असल्याचे सांगितलं जातंय. कोट्यवधी रुपयांचा हा ठेका आहे. या प्रकरणात तेरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही आरोपींना पोलिसांनी अटकही केलीय. तरी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी चुप्पी का साधली असा प्रश्न निर्माण होतो. या कोळसा चोरी (Coal Theft) प्रकरणामुळं वेकोलीचा कारभार चव्हाट्यावर आलाय.

कोळशा भरणारी लोडर मशीन कुणाची?

कोळसा चोरांनी दोन ट्रक कोळसा चोरला. कोळसा भरणारी लोडर मशीन कुणाची? असा प्रश्‍न उपस्थित होतोय. त्याचे उत्तर कोण देणार? कोळसा खाण प्रकल्प अशा तस्करांमुळे बदनाम होतोय. खाणींतील चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी व्हिजिलंस विभागावर आहे. पण हा विभागसुद्धा या चोऱ्यांमध्ये लिप्त असल्याची शंका व्यक्त केली जातेय. कारण काही वर्षांपूर्वी काटा घरावरून होणारी कोळसा चोरी उघडकीस आली. बारा चाकी ट्रकची फक्त दहा चाकेच काट्यावर चढवली जात होती. ती चोरी पकडल्यावरसुद्धा सर्वांनी हात वर केले. याहीवेळी असेच काहीतरी होण्याची शक्यता आहे. अशावेळी केंद्रीय मंत्र्यांनी यावर बोलणे आवश्यक होते. पण ते काही बोलले नाहीत.

अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयनपर्यंत नेण्याचा प्रयत्न

रावसाहेब दानवे म्हणाले, 2014 साली असलेला 18 लाख कोटींचा भारतीय अर्थसंकल्प आज 39 लाख कोटींचा झाला. 144 लाख कोटींचा विकासदर आता 210 कोटींचा झाला. प्रत्यक्ष कर 2014 पासून अजिबात वाढलेला नाही. यापूर्वी 23 टक्क्यांच्या घरात असलेला अप्रत्यक्ष कर आता 18 टक्क्यावर आला आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात अकराव्या स्थानावर होती. ती आज पाचव्या स्थानावर आली आहे. भारताची अर्थव्यवथा तीन ट्रिलीयनवरून पाच ट्रिलियनपर्यंत नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Nagpur | तुमचा पाल्य वसतिगृहात शिकतो, काय आहेत नियम?; काय म्हणतात, समाज कल्याण आयुक्त जाणून घ्या

Nagpur Police | मालकाच्या नावाचा बनावट मेल; पैसे तिसऱ्याला पाठवायला सांगितले, फेक अकाउंट निघाल्याने अडचण

Nagpur Accident | टायर फुटल्याने कार डिव्हायडरवर धडकली; नागपुरातील कोंढाळीजवळ अपघात, तीन जण जागीच ठार

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.