ठाकरे गटाच्या बैठकीतील Inside Story, नेमकं बैठकीत काय झालं? शिंदे सरकार विरोधात काही ठरलं?

"उद्धव ठाकरे उद्याही सभागृहात जाणार आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने सभागृहात प्रश्न मांडत राहू", असं सचिन अहिर यांनी सांगितलं.

ठाकरे गटाच्या बैठकीतील Inside Story, नेमकं बैठकीत काय झालं? शिंदे सरकार विरोधात काही ठरलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 9:45 PM

प्रदीप कापसे, नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने चांगलाच चंग बांधलाय. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी सातत्याने रणनीती आखत आहेत. शिंदेंना घेरण्यासाठी ते आज नागपुरात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही सहभागी झाले. पण नेमके एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले. शिंदेंना दिल्लीला एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जावं लागलं. पण ते उद्या सभागृहात जाण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे ठाकरे सुद्धा सभागृहात जाण्यावर ठाम आहेत. त्यामुळे उद्या कदाचित एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच समोरासमोर येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला घेरण्यासाठी ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील आतली बातमी आता समोर आलीय.

उद्धव ठाकरेंनी बैठकीत आपल्या पक्षाच्या आमदारांचं कौतुक केलं. आमदारांनी गेल्या चार दिवसांत सभागृहात मांडलेल्या भूमिकेबद्दल उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं आहे.

“आपण जरी कमी संख्येने असलो तरी शिवसेनेचे आमदार आहोत हे दाखवून दिलं. आपली ही एकजूट अशीच कायम ठेवायची आहे”, असं उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विधानसभा अध्यक्षांकडून आपल्याला बोलू दिलं जातं नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बैठकीत खंत व्यक्त केली. तरीही वेगवेगळ्या आयुधांचा वापर करा आणि सभागृहात प्रश्न मांडा, आक्रमकपणा सोडू नका, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला.

“या सरकारचा जानेवारी, फेब्रुवारी कधी निकाल लागेल माहिती नाही. पण आपण आपली भूमिका सोडायची नाही. महाविकास आघाडी म्हणून आपल्याला एकत्र काम करायचं आहे”, असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले.

उद्या सभागृहात अब्दुल सत्तारांविरोधात ठाकरे गटाचे आमदार आक्रमक होणार आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना तशा सूचना दिलेल्या आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे उद्याही सभागृहात जाणार आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने सभागृहात प्रश्न मांडत राहू”, असं सचिन अहिर यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्र्यांचं प्रकरण आणि अब्दुल सत्तार घोटाळा हे आम्ही काढलं नाही. न्यायालयात हे दोन्ही प्रकरणं होती. तसेच हे सरकार संविधानिक आहे की नाही हा वाद कोर्टात आहे”, असं म्हणत सचिन अहिरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

याशिवाय सभागृहात मांडलेल्या भूमिकेचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं, अशीदेखील माहिती सचिन अहिर यांनी दिली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.