Nagpur Shiv Sena | वरुण सरदेसाईंचा दावा फोल, शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर, दोघांच्या नेतृत्वात दोन आंदोलनं

शिवसेनेनं विदर्भात कंबर कसली आहे. संजय राऊत तीन दिवस नागपुरात तळ ठोकून होते. वरुण सरदेसाईंनी युवा सेनेत प्राण फुंकले. पण, राऊतांच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात नागपूर शिवसेनेत फूट दिसून आली. त्यामुळं गटबाजीनं मनपाची सत्ता कशी हस्तगत करणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Nagpur Shiv Sena | वरुण सरदेसाईंचा दावा फोल, शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर, दोघांच्या नेतृत्वात दोन आंदोलनं
नागपुरातील संविधान चौकात आंदोलन करताना शिवसेनेचे कार्यकर्ते. Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 6:20 AM

नागपूर : मनपात शिवसेनात सत्ता स्थापनेची स्वप्न पाहू लागली आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांचा नागपूर हा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात दोन आठवड्यापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत येऊन गेलेत. नागपुरात ते तीन दिवस तळ ठोकून होते. त्यानंतर सहा एप्रिल रोजी युवा सेनेचे वरुण सरदेसाई (Varun Sardesai) नागपुरात आले. त्यांनी युवकांमध्ये प्राण फुंकले. ही सारी तयारी नागपूर मनपा निवडणुकीची आहे. पण, दोन दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या समर्थनार्थ नागपुरात शिवसेनेने आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेनेत पुन्हा फूट दिसून आली. नागपुरात दोन महानगरप्रमुख आहेत. दोघांनी आपआपल्या विभागात आंदोलन करायला हवं होतं. पण, दोन्ही महानगरप्रमुखांनी (Metropolitan Chief) संविधान चौकात आंदोलन केलं.

दोन महानगरप्रमुखांची दोन आंदोलनं

किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्त्वात संविधान चौकात शिवसैनिक बुधवारी दुपारी रस्त्यावर उतरले. किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्तवात पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. किशोर पराते, प्रवीण बरडे, सतीश हरडे यावेळी उपस्थित होते. तर दुसरीकडं, प्रमोद मानमोडे यांच्या नेतृत्त्वात संविधान चौकातच संध्याकाळी शिवसैनिक नारे निदर्शनं करताना दिसले. सायंकाळी झालेल्या आंदोलनात शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, संपर्क प्रमुख मंगेश काशिकर, सुरेश साखरे, जयदीप पेंडकर, प्रवीण बरडे, विशाल बरबटे, सतीश हरडे उपस्थित होते.

कार्यक्षेत्र कशासाठी?

नागपूर शहरात शिवसेनेने दोन महानगरप्रमुख नियुक्त केले आहेत. त्यांना त्यांचे कार्यक्षेत्र सुद्धा वाटून दिलेले आहेत. तसेच शहरप्रमुख, शहर संघटक व अन्य पदाधिकाऱ्यांनासुद्धा विधानसभेनुसार कार्यक्षेत्र वाटून दिलेले आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आप-आपल्या महानगर प्रमुखाच्या कार्यक्षेत्रात आंदोलन करायला पाहिजे होते. संविधान चौकातील आंदोलनात आप-आपल्या महानगरप्रमुखाच्या कार्यक्षेत्राचे उल्लघंन करून उपस्थित नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसात झालेले सर्व कार्यक्रम पश्चिम नागपुरात झाले. मग पूर्व, दक्षिण, मध्य नागपूरचे पदाधिकारी काय करीत आहेत. शिवसेनेला जिथे मतदान होते तिकडे आपण पाठ दाखवत आहात, अशी पोस्ट एका शिवसैनिकानं टाकली आहे.

फेसबूक पोस्ट

गटबाजीने मनपाची लढाई जिंकणार का

नागपूर शिवसेनेत जुने आणि नवीन कार्यकर्ते असा वाद सुरू आहे. याबद्दल विचारलं असता, युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी हे आरोप दोन दिवसांपूर्वीच फेटाळले. ते म्हणाले, नागपुरात जुने-नवीन आता एकत्र आले आहेत. अनेक नवीन लोक आमच्यासोबत येत आहेत. जुने नवीन यांचा मेळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, दोनच दिवसांनंतर ही गटबाजी पुन्हा दिसून आली. त्यामुळं मनपाची लढाई कशी जिंकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरती ! शैक्षणिक पात्रता, शेवटची तारीख, एका क्लिकवर

Nagpur Accident CCTV : दहेगाव फाट्यावर अंगावर काटा आणणारा अपघात! तिघेही बचावले, दोघांची प्रकृती गंभीर

Vidarbha Temperature | 11 पैकी 7 दिवस देशात सर्वाधिक तापमान चंद्रपूर, अकोल्यात; विदर्भात 11 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.