Vegetables Rate | नागपुरात आठवडाभरात भाज्यांचे दर दुप्पट; उन्हामुळे भाजीपाल्याची पिकं करपली, शेतकरी-ग्राहक हैराण

उन्हामुळं अंगाची लाहीलाही होतेय. माणसं, पशूपक्षीचं काय, तर भाजीपाल्याच्या उत्पादनावरही तापमान वाढीचा परिणाम झालाय. उन्हामुळं पिकं करपली. उत्पादन कमी होत असल्यानं भाजीपाल्याचे दर वाढलेत. भाजीपाल्याच्या दरवाढीचा फटका ग्राहक व शेतकरी दोघांनाही बसतोय.

Vegetables Rate | नागपुरात आठवडाभरात भाज्यांचे दर दुप्पट; उन्हामुळे भाजीपाल्याची पिकं करपली, शेतकरी-ग्राहक हैराण
नागपूर बाजारातील भाजीपाला.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 10:19 AM

नागपूर : विदर्भासह राज्याच्या बऱ्याच भागात तापमानात वाढ (Temperature Rise) झालीय. त्यामुळे शेतातील भाजीपाल्याची पिकं करपल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झालाय. गेल्या आठ दिवसांत नागपूरच्या किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पटीने वाढलेत. एकीकडे उन्हामुळे शेतातील भाजीपाला पिकं करपल्याने शेतकऱ्यांचं नुकसान (Loss of Farmers) झालंय. तर दुसरीकडे भाज्यांच्या दरवाढीमुळे ग्राहकांना (Consumers) फटका बसतोय. सध्या नागपूरच्या किरकोळ बाजारात फरसबी 160 रुपये किलो, फुलकोबी, कोथिंबीर 120 रुपये किलो, टोमॅटो 50 रुपये किलो आणि वांगी 80 रुपये किलो आहे. तापमान वाढल्याने गेल्या आठ दिवसांत सर्वच भाज्यांचे दर दुप्पट झालेत. अशी माहिती किरकोळ भाजी विक्रेता रितेश मुडेवार यांनी दिली.

उत्पादनात घट

उन्हामुळं अंगाची लाहीलाही होतेय. माणसं, पशूपक्षीचं काय, तर भाजीपाल्याच्या उत्पादनावरही तापमान वाढीचा परिणाम झालाय. उन्हामुळं पिकं करपली. उत्पादन कमी होत असल्यानं भाजीपाल्याचे दर वाढलेत. भाजीपाल्याच्या दरवाढीचा फटका ग्राहक व शेतकरी दोघांनाही बसतोय.

माहिती करून घ्या आत्ताचे आणि आठवडाभरापूर्वीचे दर

  1. फरसबी आत्ताचे दर – 160 रु. किलो आठवडाभरापूर्वी – 60 रु. किलो
  2. शिमला आत्ताचे दर -120 रु. किलो आठवडाभरापूर्वी – 60 रु. किलो
  3. ढेमुस आत्ताचे दर – 80 रु. किलो आठवडाभरापूर्वी – 40 रु. किलो
  4. कारली आत्ताचे दर – 80 रु. किलो आठवडाभरापूर्वी – 40 रु. किलो
  5. तुरई आत्ताचे दर – 120 रु. किलो आठवडाभरापूर्वी – 40 रु. किलो
  6. वांगी आत्ताचे दर – 60 ते 80 रु. किलो आठवडाभरापूर्वी – 20 रु. किलो
  7. टोमॅटो आत्ताचे दर – ५० रु. किलो आठवडाभरापूर्वी – २० रु. किलो
  8. फुलकोबी आत्ताचे दर – 120 रु. किलो आठवडाभरापूर्वी – 50 रु. किलो
  9. लिंबू आत्ताचे दर – 10 प्रति लिंबू आठवडाभरापूर्वी – 4 रु. प्रति लिंबू
  10. कोथिंबीर आत्ताचे दर – 120 रु. किलो आठवडाभरापूर्वी – 60 रु. किलो
  11. पालक आत्ताचे दर – 80 रु. किलो आठवडाभरापूर्वी – 20 रु. किलो
  12. मेथी आत्ताचे दर – 120 रु. किलो आठवडाभरापूर्वी – 40 रु. किलो
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.