Nagpur Crime | वेकोलीचा व्यवस्थापक सीबीआयच्या जाळ्यात; कंत्राटदाराकडून कशासाठी मागितली लाच?

सुधांशू श्रीवास्तव याने अधिकार्‍यांसमोरच पन्नास हजारांची लाच मागितली. मध्यस्थी अमितने दोन हजारांची लाच मागितली. कंपनीच्या कर्मचाऱ्याने कंत्राटदाराकडून बस्तीस हजार रुपयांची लाच घेतली. सीबीआयने दोघांनाही अटक केली.

Nagpur Crime | वेकोलीचा व्यवस्थापक सीबीआयच्या जाळ्यात; कंत्राटदाराकडून कशासाठी मागितली लाच?
नागपुरातील सीबीआयचे कार्यालय.
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 11:26 AM

नागपूर : उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील सैनिक मायनिंग कंपनीला (Soldier Mining Company) वेकोलीकडून एका कामाचे कंत्राट मिळाले होते. त्या कंपनीने एमआयटी नावाच्या कंपनीला काही कामाचे कंत्राट दिले. त्या कंपनीने तक्रारदार कंत्राटदाराकडून त्याच्या दोन डोजर मशीन भाड्याने घेतल्या होत्या. कालांतराने कंत्राट रद्द झाले. यानंतर वेकोलीच्या कामावर असलेल्या दोन डोजर मशीन परत देण्याची मागणी कंत्राटदाराने केली. उपक्षेत्र व्यवस्थापक सुधांशू श्रीवास्तव (Manager Sudhanshu Srivastava) याने दोन्ही मशीन परत करण्यासाठी प्रत्येकी पंचेवीस हजार रुपये म्हणजे एकूण पन्नास हजार रुपयांची लाच मागितली. ती रक्कम अमित सिन्हा याच्याकडे देण्यास सांगितली. अमितनेही मध्यस्थी करण्यासाठी दोन हजारांची मागणी केली. याबाबत कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीची दखल घेत सीबीआयने (CBI) सापळा रचला. त्यात सुधांशू श्रीवास्तव याने अधिकार्‍यांसमोरच पन्नास हजारांची लाच मागितली. मध्यस्थी अमितने दोन हजारांची लाच मागितली. कंपनीच्या कर्मचाऱ्याने कंत्राटदाराकडून बस्तीस हजार रुपयांची लाच घेतली. सीबीआयने दोघांनाही अटक केली.

लाच मागण्याचे कारण काय

सैनिक मायनिंगला मकरधोकडा येथील साईट तीन येथून ओव्हरबर्डन हटविण्याचे कंत्राट दिले होते. सैनिक मायनिंगने ते काम मेसर्स एमआयटीला दिले होते. एमआयटीने डोजर आणि ग्रेडर मशीन पुरवठा करण्याचे काम तक्रारदार कंपनीला दिले. कंत्राट संपल्यानंतर कामावर लावलेल्या मशीन परत करावयाच्या होत्या. त्यासाठी तक्रारदार यांनी व्यवस्थापक श्रीवास्तव यांना सिन्हाच्या माध्यमातून दोन मशीन सोडण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती.

बत्तीस हजार घेताना अटक

व्यवस्थापक सुधांशू श्रीवास्तव याने स्वतः लाच घेतली नाही. त्यासाठी त्याने अमित सिन्हाला मध्यस्ती ठेवले. सिन्हाने मध्यस्ती म्हणून काम करण्यासाठी दोन हजार रुपये मागितले. शनिवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पंचासमोर दोघांनाही अटक केली. श्रीवास्तवने सिन्हाच्या माध्यमातून बत्तीस हजार रुपये घेतले. दोघांवरही लाच घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयच्या एका पथकाने श्रीवास्तवच्या घराचीही झडती घेतल्याची माहिती आहे.

Corona | आम्हाला 50 हजारांची मदत कधी मिळणार?; नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचा प्रश्न

प्रधान सल्लागारानेच सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली; मुख्यमंत्री उत्तर देणार काय?, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Nagpur | पतंग खेळताना अक्रित घडलं, 12 वर्षीय मुलाचा दुमजली इमारतीवरुन पाय घसरला अन्….

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.