विदर्भात शिंदे गटाचा मोठा डाव; 62 पैकी इतक्या जागांवर दावा, भाजप आणि अजितदादांच्या वाट्याला किती जागा?

Vidarbha Vidhansabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे दौरा केला. त्यात त्यांनी मराठवाड्यासह विदर्भातील जागा जिंकण्याचा मंत्र दिला. पण आता शिंदे गटाने विदर्भातील अनेक जागांवर दावा केला आहे.इतक्या जागा शिंदे गट लढण्यास इच्छूक आहे.

विदर्भात शिंदे गटाचा मोठा डाव; 62 पैकी इतक्या जागांवर दावा, भाजप आणि अजितदादांच्या वाट्याला किती जागा?
विदर्भातील इतक्या जागांवर शिंदे गटाचा दावा
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 11:26 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे येऊन गेले. त्यांनी बैठकीमध्ये मायक्रो प्लॅनिंगवर भर दिला. एक एक जागा जोडण्याचा मंत्र दिला. विदर्भासह मराठवाड्यावर भाजपचे विशेष लक्ष आहे. लोकसभेचा वचपा काढण्यासाठी भाजप अधिकाधिक जागा लढवण्यावर भर देत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने पण भाजपवर मोठा डाव टाकला आहे. विदर्भातील 62 जागांपैकी अर्ध्या जागांच्या जवळपास शिंदे गट विधानसभेसाठी आग्रही आहे. त्यामुळे अनेक जागांसाठी रस्सीखेच दिसून येईल. तर काही भागात बंडाळी सुद्धा होऊ शकते.

इतक्या जागांवर केला दावा

विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने विदर्भातील सर्व 62 मतदारसंघात सर्वे केला आहे. त्यात विदर्भातील 24 जागांवर आमची चांगली स्थिती असल्याचा दावा कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीत आम्ही 24 जागा लढणार आहे. आमच्या मित्रपक्षाला आम्ही समजावून सांगू, असे राठोड म्हणाले.

हे सुद्धा वाचा

11 जिल्ह्यात मजबूत दावेदारी

विदर्भातील 11 ही जिल्ह्यात शिवसेना निवडणूक लढणार आहे. विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात शिवसेना नशीब आजमावणार आहे. त्यातच अजित पवार यांनी सुद्धा विदर्भात जनसंवाद यात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन केले होते. शिंदे गटाच्या 24 जागांवरील दाव्यामुळे भाजप आणि पवार गटाच्या खात्यात 32 जागा येतील. अर्थात हा दावा दोन्ही पक्षांना किती मान्य होतो हा प्रश्नच आहे. अनेक जागांवर अजून ही महायुतीत रस्सीखेच दिसून येत आहे. विदर्भात भाजपचं पारडं जड असताना त्यांना हा दावा कितपत मान्य होतो हा प्रश्न आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी दौऱ्यावर

5 ॲाक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहोरादेवी येथे नगारा भवनचं लोकार्पण होणार आहे. या तारखेला बंजारा समाजाची काशी पोहोरादेवी येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेला एक लाख लोक येणार असल्याचा दावा संजय राठोड यांनी केला. पोहोरादेवी येथे भव्य दिव्य नगारा भवनची इमारत सज्ज झाल्याची माहिती त्यांनी दिली.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.