कोरोना नियमांचं उल्लंघन, एकाच दिवशी 50 हजार रुपयांचा दंड वसूल, नागपूर महापालिकेचा दणका

महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (9 मार्च) रोजी 9 दूकाने प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

कोरोना नियमांचं उल्लंघन, एकाच दिवशी 50 हजार रुपयांचा दंड वसूल, नागपूर महापालिकेचा दणका
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 8:50 AM

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (9 मार्च) रोजी 9 दूकाने प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. शासन आणि प्रशासनाने कोरोनाचे घालून दिलेले नियम न पाळल्याने हा दंड वसूल करण्यात आला. (Violation of Corona rules fine of Rs 50,000 on One day Nagpur Municipal Corporation Action)

महापालिकेच्या पथकाने 97 प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

कशी केली कारवाई?

महापालिकेच्या पथकाने 97 प्रतिष्ठाने आणि मंगल कार्यालयांची तपासणी केली. यामध्ये शारिरीक अंतर न पाळणाऱ्यांकडून दंड वसूल केला गेला. यामध्ये एकाच दिवशी तब्बल 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या कारवाईमुळे नियम पायदळी तुडवणारे आतातरी जागे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कुठे कुठे कारवाई?

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 8 मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. धरमपेठ झोनअंतर्गत 6 प्रतिष्ठानांची तपासणी करुन 10 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसंच शहरातील गर्दीची ठिकाणांवरही इथून पुढे वॉच ठेवण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नागपुरात लसीकरणाची परिस्थिती काय?

नागपूर शहरात आता 60 केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे. सरकारी आणि खाजगी मिळून 60 केंद्रांवर लसीकरण होत आहे. सरकारी रुग्णालयात निशुल्क तर खाजगी मध्ये 250 रुपये भरून लसीकरण केलं जात आहे. दोन शिफ्टमध्ये लसीकरण पार पडत आहे. सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत लसीकरण सुरु आहे.

कोरोनाला बरोबर एक वर्ष पूर्ण, थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा रुग्णवाढीचा प्रकोप

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाला बरोबर एक वर्ष पूर्ण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात कोरोना रुग्ण सापडलेल्या घटनेला मंगळवारी बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत.

(Violation of Corona rules fine of Rs 50,000 on One day Nagpur Municipal Corporation Action)

हे ही  वाचा :

नागरिकांचं सहकार्य मिळालं नाही तर मुंबईत लॉकडाऊनचा विचार, अतिरिक्त आयुक्तांचा सबुरीचा इशारा

Maharashtra Corona Report : राज्यात 9 हजार 927 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, मुंबई, पुणे, नाशिकमधील स्थिती काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.