election | नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या उर्वरित जागांसाठी मतदान; उद्याच्या निकालाकडं साऱ्यांचे लक्ष

विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या ठिकाणीही ओबीसीच्या आरक्षणामुळे रद्द झालेल्या जागेवर मतदान होत आहे. उद्या, बुधवारी सकाळी मतमोजणीला होणार आहे.

election | नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या उर्वरित जागांसाठी मतदान; उद्याच्या निकालाकडं साऱ्यांचे लक्ष
गोंदियातील एका मतदान केंद्रावर मतदान करताना मतदार
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 11:32 AM

नागपूर : विदर्भातील अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या नगरपंचायतीच्या जागेवर आज मतदान होत आहे. नागपूर जिल्ह्यात हिंगणा आणि कुही या दोन नगरपंचायतीमधील प्रत्येकी 4 जागांसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या ठिकाणीही ओबीसीच्या आरक्षणामुळे रद्द झालेल्या जागेवर मतदान होत आहे. उद्या, बुधवारी सकाळी मतमोजणीला होणार आहे. ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर नगरपंचायतमधल्या निवडणुकीत ओबीसीसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती. इतर जागांसाठी ज्यामध्ये खुल्या वर्गासाठी आणि अनुसूचित जाती जमाती राखीव वर्गासाठी ही निवडणूक प्रक्रिया 21 डिसेंबरला पार पडली.

भंडारा-गोंदियात मतदानाला सुरुवात

गोंदिया-भंडारा जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचत आहे. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये 13 जागा पंचायत समिती 25 जागा व नगरपंचायती करता 12 जागांकरिता मतदान होणार आहे. तर गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता गोंदिया जिल्ह्यामध्ये 10 जिल्हा परिषद, पंचायत समिती 20 व नगरपंचायती करता 6 जणांवर मतदान होणार आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नाना पटोले राष्ट्रवादीतर्फे प्रफुल पटेल आणि भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या मतदानाच्या पेट्या उघडणार आहेत. मतदार राजा कुणाला कौल देतो ते पाहण्यासारखं असेल.

चंद्रपुरात नगरपंचायतीच्या 20 जागांसाठी मतदान

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या 20 जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. एकूण 68 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही- पोंभुर्णा- गोंडपिंपरी -कोरपना- जिवती -सावली या नगरपंचायतीत ही निवडणूक होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात इथली प्रक्रिया थांबवली होती. ओबीसींसाठी राखीव असलेल्या या जागा आता सर्वसाधारण गटातून भरत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. उद्या सर्वच जागांची मतमोजणी त्या-त्या नगरपंचायतीच्या मुख्यालयात होणार आहे.

गडचिरोलीत मतदाराना संथ प्रतिसाद

गडचिरोली जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये आज 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया साडेसात वाजेपासून सुरू झाले. ओबीसी आरक्षण असलेल्या या जागांवर आरक्षण सोडून सर्वसाधारण जागांसाठी मतदान होत आहे. सिरोंचा, अहेरी, चामोर्शी, धानोरा, कुरखेडा या नगरपंचायतीकरिता 11 जागांवर 5 हजार 706 मतदार आपला हक्क आज बजावणार आहेत. या भागात राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम, भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते दीपक आत्राम या तीन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यवतमाळात नगरपंचायतीच्या 18 जागांसाठी मतदान

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, महागाव या 5 नगरपंचायतच्या 18 जागेसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी 84 जागेसाठी 21 डिसेंबरला मतदान झाले. मात्र ओबीसी आरक्षणामुळे या 18 जागेवरच मतदान लांबणीवर पडले होते. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान आहे. 19 जानेवारील मतमोजणी होणार आहे. राळेगाव 3 जागांसाठी 18 उमेदवार निवडूक रिंगणात आहेत. बाभूळगावात 4 जागासाठी 15 उमेदवार, कळंब येथे 4 जागांसाठी 29 उमेदवार, मारेगाव येथे 3 जागांसाठी 22 उमेदवार, महागाव येथे 4 जागांसाठी 15 उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत. कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. या नगरपंचायतवर सत्ता कोणाची येणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी; अडीच हजारांच्या उंबरठ्यावर बाधित

Accident | रुग्णावर उपचार करून परतत होते नागपूरला, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत टवेरातील चार ठार

Nagpur suicide | थडीपवनीतील शेतकऱ्याची आत्महत्या; का घ्यावी लागली विहिरीत उडी?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.