वर्ध्यात म्युकरमायकोसिसचे 81 रुग्ण, कोरोना नसलेल्यांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने चिंता वाढली

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी सध्या म्युकरमायकोसिसचे (Wardha Mucormycosis Patients Increases) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 81 रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

वर्ध्यात म्युकरमायकोसिसचे 81 रुग्ण, कोरोना नसलेल्यांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने चिंता वाढली
Mucormycosis
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 9:04 AM

वर्धा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी सध्या म्युकरमायकोसिसचे (Wardha Mucormycosis Patients Increases) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 81 रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोव्हिडमुक्त नसलेल्या तिघांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे (Wardha Mucormycosis Patients Increases 81 Patients Registered And One Died).

जिल्ह्यात आतापर्यंत 81 म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली असून, त्यापैकी 19 व्यक्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या 61 व्यक्तींवर उपचार केले जात आहेत.

आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक म्हणजे 39 बाधित हे 45 ते 60 वयोगटातील आहेत. तर 18 ते 45 वयोगटातील 20 रुग्ण आणि 60 पेक्षा जास्त वयोगटाच्या 22 रुग्णांचा समावेश आहे. 81 म्युकरमायकोसिस बाधितांपैकी 56 व्यक्तींना या आजाराची लागण होण्यापूर्वी प्राणवायू द्यावा लागला होता. उर्वरित 25 रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला नव्हता. तर कोव्हिडचा संसर्ग झाल्याने गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी स्टेरॉईड दिले जाते. अशाच 38 रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे निदान झाले आहे. असे असले, तरी उर्वरित 43 म्युकरमायकोसिस बाधितांची स्टेराॅईड थेअरपीबाबतची हिस्ट्री नाही.आढळलेल्या रुग्णांमध्ये 62 पुरुष तर 19 महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

81 म्युकरमायकोसिस बाधितांपैकी 78 व्यक्तींना यापूर्वी कोव्हिडचा संसर्ग झाला होता. तर तीन व्यक्तींना कोव्हिडचा संसर्ग झाला नसला तरी त्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोव्हिडसोबतच म्युकरमायकोसिसबाबत दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे.

81 म्युकरमायकोसिस बाधितांमध्ये मधुमेह असलेल्या 68, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले 28, तर दीर्घकालीन आजार असलेल्या 29 व्यक्तींचा समावेश असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

म्युकरमायकोसिसचा कोणाला अधिक धोका?

बुरशीजन्य संसर्ग असलेला म्युकरमायकोसिस हा प्रामुख्याने मधुमेह, वयोवृद्ध तसेच पूर्वीचे विविध आजार असलेल्यांना होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी हा आजार जीवघेणा ठरणाराच आहे. त्यामुळे कोव्हिड संकटाच्या काळात वाढते म्युकरमायकोसिसचे रुग्ण हे सध्या आरोग्य विभागासाठी मोठे आव्हान आहे.

साधारणत: नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक किंवा डोळ्यांना इजा पोहोचवितो. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभाेवती आणि चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे आणि हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. सदर लक्षणे आढळलेल्या व्यक्तीने तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावे.

Wardha Mucormycosis Patients Increases 81 Patients Registered And One Died

संबंधित बातम्या :

कोरोना, म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी नागपूर प्रशासनाची मोहीम, 2 दिवसात अधिकाऱ्यांच्या शंभर गावांना भेटी

बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचं थैमान, एकट्या अंबाजोगाईत 86 रुग्ण, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’चा विस्फोट, आतापर्यंत 53 बळी, रुग्णांची संख्या पावणे सहाशेवर!

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.