सुडाच्या भावनेनं कारवाई करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल, Sanjay Raut यांचा भाजपवर टोला
केंद्र सरकार सुडाच्या भावनेने कारवाई करतो. राज्य सरकार तसं काही करत नाही. असं करायचं असेल तर त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागले, असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. पण, महाराष्ट्र सरकार असं काही करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
नागपूर : केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) सुडाच्या भावनेनं कारवाई करत आहेत. ज्या पद्धतीनं ते कारवाई करत आहेत त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार करणार नाही, असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिलंय. महाराष्ट्राचं गृहमंत्रालय तर असं कधीच करणार नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. विरोधीपक्ष नेते कितीही बोंबलले की सुडाच्या कारवाया सुरू आहेत. तरी तसं आम्ही करणार नाही. जर आम्हाला सुडाच्या करायच्या असले तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. आम्हाला त्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी सांगितलं. श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांची एक संपती जप्त केल्याची माहिती मिळत आहे. पूर्ण माहिती मिळाली की बोलू, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.
विदर्भाला लवकरच प्रतिनिधित्व मिळेल
तेलाच्या किंमती वाढत आहे. काल संसदेत महागाईवर चर्चा झाली आणि सभागृह चालू दिलं नाही. आता निवडणुका संपल्या, हेच भाजपचं धोरण आहे. चाल आहे. लोक यात फसतात. देशात पुन्हा एकदा महागाईवर एक माहौल बनणार. खरी समस्या रशिया-युक्रेन, हिजाब, काश्मीर फाईल नाही, देशाची खरी समस्या बेरोजगारी आणि महागाई आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेक वेळा आमदारांना जेवायला बोलावलं जाते, ही परंपरा आहे. महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये राज्यपाल दोन्ही सरकारवर निशाणा साधतात. आणखी राज्यात राज्यपाल आहे. आणखी इतर राज्यात ईडीचे कार्यालय असू शकतात. जिथे भाजपचं सरकार नाही तिथे राज्यपाल आम्हाला टार्गेट करतात. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. विदर्भात प्रतिनिधीत्व देण्याबाबत मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करत आहे. विदर्भाला लवकरंच प्रतिनिधीत्त्व मिळेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
पुराव्यात दम असेल तर पोलीस कारवाई
खासदार संजय राऊत म्हणाले, निल सोमय्यांबाबत सरकारकडे काही पुरावे देण्याचं की केलं. त्यापुढचं काम तपास यंत्रणांना करायचं आहे. पुराव्यात काही दम असेल तर पोलीस कारवाई करतील. माझा आणि सरकारचा दबाव नाही. तपास यंत्रणा स्वतंत्र आहे. मला भीती वाटते की आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल त्याच्यावर सुद्धा ईडी कारवाई करेल. कर्नाटकात काही मंदिराबाहेर मुसलमानांना दुकान लावण्याची मनाई हे चुकीचं आहे. राजकीय स्वार्थासाठी असं वातावरण निर्माण केलं तर देशात स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती निर्माण होईल. उत्तर प्रदेशात ओवैसी यांचे काम झालंय. भाजप जिंकलीय.
Video | आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी? Raju Shetti म्हणतात, पक्षात सक्रिय नाही