नागपूर : बांबू हे गवत आहे कोळशाला पर्याय म्हणून याचा वापर करता येतो. शिवाय बांबूपासून जर्सी तयार करता येते. या जर्सीमुळं घाम फुटत नाही. बल्लारपूर येथे भिमा बांबूचे उत्पादन एकरी 200 टन उत्पादन होते. पॉवर प्लांटसाठी बांबू उपयोगात येतो. त्यामुळं बांबूची लागवड करण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. अग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून आज बोलत होते.
फवारणी ड्रोनची किंमत सहा लाख रुपये होती. लिथियम बॅटरीवर ते चालत होते. आता फ्लेक्स इंजीन इथेनॉलवर चालणार आहे. यामुळं ड्रोनचा खर्च कमी होईल. नॅनो युरियाचा अर्थ पाचशे एमएलची बॉटल. ही युरियाच्या कित्तेक पटीनं काम करते. हातानं खत टाकल्यास युरिया 70 टक्के वाया जातो. 30 टक्के उपयोगी येतो. तर, ड्रोनने फवारणी केल्यास याच्या उलट होते. 30 टक्के वाया जाते, 70 टक्के उपयोगी पडते. गावागावात यातून रोजगारही निर्मिती होणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
प्राकृतिक शेतीसाठी आचार्य देवव्रत, सुभाष पाळेकर हे काम करतात. जीवामृताचा वापर करतात. सेंद्रीय पद्धतीचा भाजीपाला निघत असल्यानं त्याला मागणी जास्त आहे. आधी बाजारात 8 टक्के दलाली लागत होती. आता थेट ग्राहकाला विक्री करतात. त्यामुळं रेट चांगला मिळतो. सेंद्रीय भाजीपाल्यासाठी सर्टिफिकेशनची साधी पद्धती करण्यात यावी. जैविक शेती, प्राकृतिक शेतीकडं आम्ही जात आहोत. नॅनो फर्टिलायझर, मिक्स खतांचा वापर करता आहोत. आता सीएनजीवर ट्रक्टर सुरू व्हावेत, यासाठी प्रयत्न असल्याचं गडकरी म्हणाले.
पूर्व विदर्भात धानपीक मोठ्या प्रमाणत होते. धान घरू घेऊन आल्यानंतर तणस शेतात राहते जनावरांच्या चाऱ्यासह या तणसाचा दुसराही उपयोग करता येतो. त्यामुळं तणसापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प तयार होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. पैसे वाचविणे हे पैसे कमविण्यासारखे असल्याचं ते म्हणाले.