पर्यटनाला केव्हा येणार चांगले दिवस?, नागपुरातील पर्यटकांचे जंगल सफारीला प्राधान्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आता शिथिल केले जात आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. त्यामुळं पर्यटनाला सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसते. गेल्या दोन वर्षांपासून नागरिक घरीच पडून आहेत. त्यामुळं ते जंगल सफारीला प्राधान्य देताना दिसून येत आहे.
नागपूर : शहरातील कोरोनाचे निर्बंध शिथिल झालेले आहेत. पर्यटनासाठी बुकिंग (Booking for tourism) केले जात आहे. राज्याबाहेरील स्थळांना पर्यटक पसंती देताना दिसतात. त्यामध्ये राजस्थान, केरळ, गोवा, अंदमान निकोबार, कश्मीर, मालदीव, कोकण या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. राज्यातही जंगल सफारी सुरू झाली आहे. त्यामुळं जंगल सफारीवर ( jungle safari) जाण्यसाठी पर्यटक उत्सुक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेलं पर्यटन क्षेत्रही आता सावरत आहे. दोन लसी घेतलेल्यांना रेल्वे, विमानात प्रवेश (train, plane access ) दिला जात आहे. त्यामुळं लसी घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त झालंय. बहुतेक सर्व जणांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेतल्या आहेत. आता आरटीपीसीआर चाचणीची अटही शिथिल केली गेली आहे.
जंगल सफारी फुल्ल
विदर्भात अभयारण्य मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळं परदेशी पर्यटन विमानानं सध्य पाहिजे त्या प्रमाणात खुले झाले नाही. त्यामुळं स्थानिक पातळीवर जंगल सफारीला प्राधान्य दिलं जात आहे. नागझिरा, नवेगावबांध, पेंच, ताडोबा, बोर अभयारण्य यांना वन डे टूर म्हणून पाहिले जात आहे. दहावी-बारावीची परीक्षा आता सुरू होत आहे. त्यामुळं सध्यातरी पर्यटन खऱ्या अर्थानं सुरू झालेले नाही. पण, या परीक्षा संपल्या की मग पर्यटकांना फिरण्याचा मोह आवरता येणार नाही.
इंधन दरवाढीचे पर्यटनावर परिणाम
आता कोरोना पाहिजे त्या प्रमाणात धोकादायक दिसून येत नाही. त्यामुळं नागरिक बिनधास्त झाले आहेत. पण, पर्यटनाचे दरही वाढलेले आहेत. कारण इंधनवाढ गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा फटका पर्यटकांनाच बसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आता शिथिल केले जात आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. त्यामुळं पर्यटनाला सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसते. गेल्या दोन वर्षांपासून नागरिक घरीच पडून आहेत. त्यामुळं ते जंगल सफारीला प्राधान्य देताना दिसून येत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी, विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख