Nagpur | मिशन वात्सल्य समितीच्या सर्वेक्षणाला गती केव्हा मिळणार?, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
मिशन वात्सल्य समितीच्या सर्वेक्षणाला गतिशील करण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेतली आहे. तातडीने कामे पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले.
नागपूर : जिल्हाधिकारी विमला (Collector Vimala) म्हणाल्या, तालुकास्तरीय महिला व बालविकास अधिकारी (Women and Child Development Officer)यांच्याकडे यासंदर्भात देण्यात आलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. कोविड संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची पूर्ण यादी तयार करण्यात यावी. रस्त्यावर राहणाऱ्या भटकणाऱ्या मुलांच्या सर्वेक्षणाची गती वाढवावी. कोरोनामध्ये विधवा झालेल्या महिलांच्या मदतीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मदतीची सर्व घटकातील प्रतिपूर्ती करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मिशन वात्सल्य समितीच्या (Mission Vatsalya Samiti) सर्वेक्षणाला गतिशील करण्यात यावे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तातडीने कामे पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी येथे दिले.
1,323 बालकांना योजनेचा लाभ
या बैठकीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. 79 बालकांची सध्या नोंद आहे. या बालकांचे बँकेमध्ये खाते उघडण्यात आले आहे. आतापर्यंत पालक मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या 2618 आहे. त्यापैकी 1323 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळाला आहे. या बैठकीमध्ये बाल विकास संरक्षण अधिकाऱ्यांनी या संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन करावे, कृती दल स्थापन करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पोलीस, महसूल यंत्रणाही सहभागी
रस्त्यावरील प्रत्येक बालकांची नोंद घेण्यात यावी, त्यांना ओळखपत्र सुविधा मदत करावी, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्या संदर्भात झालेल्या कार्याची प्रतिपूर्ती 24 तासात सादर करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. या संदर्भात 15 दिवस सतत सर्वेक्षण करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे. तसेच या काळात विधवा झालेल्या महिलांना जिल्हा कौशल्य विकास विभागामार्फत आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबतची सूचना त्यांनी केली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी जिल्हा कृती दल समितीच्या कामकाजाचा आढावा सादर केला. सर्व तालुक्याचे तालुका बाल विकास अधिकारी तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख पोलीस व महसूल यंत्रणेचे अधिकारीही सहभागी झाले होते. मिशन वात्सल्य समितीच्या सर्वेक्षणाला गतिशील करण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेतली आहे. तातडीने कामे पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले.