Nitin Gadkari : विहिरीमध्ये जीव देईन, पण मी काँग्रेसमध्ये येणार नाही, नितीन गडकरी असं का म्हणाले?

माझ्या मित्रांनी मला एक पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. त्यातलं वाक्य मला अजूनही आठवतं की, युद्धभूमीवर हरल्यावर ती संपत नाही. पण युद्धभूमी सोडून पळतो तेव्हा तो संपतो.

Nitin Gadkari : विहिरीमध्ये जीव देईन, पण मी काँग्रेसमध्ये येणार नाही, नितीन गडकरी असं का म्हणाले?
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 8:05 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मी स्टुडन्ट लीडर असताना माझे मित्र श्रीकांत जिचकार (Srikanth Jichkar) होते. जिचकार मला एक दिवस म्हणाले, तू एक चांगला माणूस आहेस. एक चांगला राजकारणी (politician) आहे. पण तू एका चांगल्या पक्षात नाही. तेव्हा मी त्याला म्हणालो की, मी विहिरीमध्ये जीव देईन. पण काँग्रेसमध्ये (Congress) येणार नाही. कारण मला काँग्रेसची आयडालॉजी पसंत नाही. तेव्हा त्यांनी म्हटलं की, तुमच्या पार्टीला भविष्य नाही. मी त्याला उत्तर दिलं असेन, की नसेन, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातील एक संदर्भ देताना आज केले.

युद्धभूमी सोडून पळणारा हरतो

नितीन गडकरी म्हणाले, तेव्हा आमचा पक्ष निवडणूक हरायचा. माझ्या मित्रांनी मला एक पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. त्यातलं वाक्य मला अजूनही आठवतं की, युद्धभूमीवर हरल्यावर ती संपत नाही. पण युद्धभूमी सोडून पळतो तेव्हा तो संपतो. तुम्हाला यश मिळते त्याचा आनंद फक्त तुम्हा एकट्याला होतो. तेव्हा त्याचा काही अर्थ नसतो. पण तुम्हाला जेव्हा यश मिळते आणि त्याचा आनंद तुमच्यापेक्षा जास्त आनंद तुमच्या सोबत काम करणाऱ्या लहानांपासून मोठ्यांना होतो, तेव्हा त्याला जास्त महत्त्व असतं.

वापरा आणि फेकून द्या, असं करू नये

मानवी संबंध ही सगळ्यात मोठी ताकद असते. उद्योग सामाजिक आणि पॉलिटिक्समध्ये त्याच जास्त महत्व आहे. म्हणून कधी पण वापरा आणि फेकून द्या असं काम करू नये. चांगले दिवस असो की वाईट दिवस ज्याचा हात एकदा पकडला त्याचा हात पकडून ठेवा. परिस्थितीनुसार बदलू नका. एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.