Nagpur Crime | पारडीत रात्री फुटपाथवर झोपण्यावर मजुरांचा वाद, गट्टूने डोक्यावर वार करत एकाची हत्या

नागपुरात हत्यासत्र सुरूच आहे. शनिवारी पहाटे एक मजूर रक्ताच्या थारोड्यात पडलेला दिसला. पोलिसांनी तपास केला असता दोन मजुरांचा रात्री फुटपाथवर झोपण्यावरून वाद झाला. यातून एका मजुराने दुसऱ्या मजुराची हत्या केली. आरोपीने पोलिसांना खुनाची कबुली दिली आहे.

Nagpur Crime | पारडीत रात्री फुटपाथवर झोपण्यावर मजुरांचा वाद, गट्टूने डोक्यावर वार करत एकाची हत्या
नागपुरातील पारडी भागात मजुराची हत्या करण्यात आली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 11:22 AM

नागपूर : नागपुरात धुळवड शांततेत पार पडली. पण, हत्या सत्र सुरूच आहे. पारडी पोलीस स्टेशन (Pardi Police Station) हद्दीत पारडी चौकात एका तीस वर्षीय मजूर तरुणाची अज्ञात आरोपींनी हत्या केली. मृतकाचे नाव सोनू काशीराम बनकर आहे. तो मजुरीचे काम करायचा. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. जुन्या वादातून ही घटना घडली. आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा असल्याचं समोर येत आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या (CCTV) साह्याने तपास सुरू केलाय. मृतक हा मध्य प्रदेशामधील रहिवासी आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त कलवानिया (Deputy Commissioner of Police Kalwania) यांनी दिली.

गट्टूने केले डोक्यावर वार

अंबेनगरातील दामोदर दासरथीवार असे आरोपीचे नाव आहे. तो मजुरीचे काम करतो. सोनू बसकर असं मृत युवकाचं नाव आहे. तो मूळचा मध्यप्रदेशातील इटारसीमधील रहिवासी आहे. मजुरीच्या कामासाठी तो नागपूरला आला होता. सकाळी मजुरी कराचया नि रात्र परिसरातील फुटपाथवर झोपायचा. शनिवारी पहाटे त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा दिसल्या. ज्या गट्टूने त्याच्या डोक्यावर वार केले तो बाजूलाच पडला होता.

आरोपीने दिली खुनाची कबुली

रात्री सोनू झोपला असताना दामोदर तिथे आला. त्याने या जागेवर झोपण्यासाठी सोनूसोबत वाद घातला. मात्र, सोनूने त्याला हाकलून लावले आणि झोपी गेला. पहाटे दामोदर या ठिकाणी आला. त्याने झोपण्यावरुन पुन्हा वाद घातला. याशिवाय गट्टूने सोनूच्या डोक्यावर वार केले. यात सोनू ठार झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आढळून आलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. युनिट पाचच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती आहे.

समुपदेशन किटमध्ये चक्क रबरी लिंग, आशा वर्करांसमोर पेच; Chitra Kishor यांची राज्यसरकारवर सडकून टीका

Nagpur | जलजागृती सप्ताहानिमित्त जल रेसिपी स्पर्धा, पाहा कमीत-कमी पाणी वापरून तयार केलेले पदार्थ

Nagpur मनपात Fireman पदासाठी भरती, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 मार्च

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.