Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिग्गजांच्या नावांचा विचार; उत्सुकता शिगेला!

साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. संमेलनपूर्व गुरुवारी 02 डिसेंबर रोजी सायं. 7.00 वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संमेलनस्थळी करण्यात आले आहे. शनिवार 4 डिसेंबर रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिग्गजांच्या नावांचा विचार; उत्सुकता शिगेला!
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिग्गजांची नावे चर्चेत आहेत.
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 12:58 PM

नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते होणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अमिताभ बच्चन, गुलजार, जावेद अख्तर आणि आशा भोसले यांच्या नावांचा विचार सुरू असल्याचे समजते.

नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर या तारखांना होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली असून, स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ असणार आहेत. आता या संमेलनाचे उदघाटन कुणाच्या हस्ते करायचे याचा विचार सुरू आहे. गायिका आशा भोसले, गीतकार आणि कवी गुलजार यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. सोबतच महानायक अमिताभ बच्चन आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या नावांचाही विचार सुरू आहे. यापैकी कोणी निमंत्रण स्वीकारेल याची उत्सुकता आहे. दरम्यान, साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. संमेलनपूर्व गुरुवारी 02 डिसेंबर रोजी सायं. 7.00 वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संमेलनस्थळी करण्यात आले आहे. शनिवार 4 डिसेंबर रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे. तसेच संमेलन समारोपाच्या दिवशी एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.

पहिला दिवस : शुक्रवार, 3 डिसेंबर

शुक्रवार 03 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वा. ग्रंथदिंडी निघेल. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिकळवाडी, नाशिक येथून निमाणी बस स्टँडपर्यंत पायी जावून तेथून वाहनांनी कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिकच्या प्रवेशद्वारापर्यंत जाईल. तेथून परत दिंडी पायी संमेलन स्थळापर्यंत जाईल. संमेलनस्थळी सकाळी 11.00 वा. ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. दुपारी 4.00 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रथा व परंपरेनुसार स्वागताध्यक्षांचे भाषण, 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचा आणि उपस्थित संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार, 93 व्या संमेलनाच्या अध्यक्षांचे मनोगत आणि नवीन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान कार्यक्रम, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण होईल. सुरुवातीला स्वागत गीत, संमेलन गीत आणि अखेरीस आभार प्रदर्शन असेल. रात्री 9 वा. निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होईल. कवी श्रीधर नांदेडकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून सूत्रसंचलन संजय चौधरी हे करणार आहेत.

दुसरा दिवस : शनिवार, 4 डिसेंबर

सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे श्री. दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. महामंडळाच्या वतीने एका ज्येष्ठ लेखक व प्रकाशक यांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार, कांदबरीकार मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनात ‘संवाद लक्षवेधी कवींशी’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. लक्षवेधी कवी म्हणून सर्वश्री प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम (सौमित्र), सुचिता खल्लाळ, खालील मोमीन आणि वैभव जोशी या कवींसमवेत विश्वाधार देशमुख आणि गोविंद काजरेकर हे त्यांचा काव्यप्रवास उलगडून दाखविणार आहेत. दुपारच्या सत्रात ‘स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळक’ या विषयावर परिचर्चा आयोजित केली आहे. या चर्चेचे सूत्रधार डॉ. एकनाथ पगार आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी, रेखा इनामदार साने, डॉ. गजानन जाधव आणि डॉ. मोना चिमोटे हे सहभागी होणार आहेत. दुपारच्या सत्रात कथाकथनाचा कार्यक्रम विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. आघाडीचे कथाकार गिरीश देसाई, विद्याधर बनसोड, बाबासाहेब परीट, राजेंद्र गहाळ हे आपल्या कथा सादर करतील. कथाकथनाचे प्रात्यक्षिक म्हणून हा साहित्य संमेलनात महत्वपूर्ण कार्यक्रम ठरणार आहे. सायंकाळी कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार या विषयावर जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यामध्ये मकरंद कुलकर्णी, डॉ. आशुतोष रारावीकर, विनायक गोविलकर, डॉ. हंसराज जाधव, दीपक करंजीकर, डॉ. राहुल रनाळकर हे वक्ते म्हणून असतील. सायंकाळी गोदातिरीच्या संतांचे योगदानः रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादामध्ये धनश्री लेले, प्रा. विवेक अलोणी, चारुदत्त आफळे, डॉ. दत्तात्रय घुमरे, गीता काटे, बिशप थॉमस डाबरे, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांस वक्ते म्हणून निमंत्रित केले आहे.

तिसरा दिवस : रविवार, 5 डिसेंबर

परिसंवाद : सकाळी ‘मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दोन पावले मागे’ शफ़ाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये वक्ते लता नार्वेकर, सर्वश्री. पराग घोंगे, डॉ. सतीश साळुंके, सुबोध भावे आणि प्राजक्त देशमुख यांस निमंत्रित केले आहे. सकाळी ‘शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्ताचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका ’ या भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये आ. बच्चू कडू, रमेश जाधव, मिलींद मुरुगकर व संजय आवटे यांचा सहभाग अपेक्षित आहे. दुपारी ‘ऑनलाईन वाचन – वाङमय विकासाला तारक की मारक’ हा परिसंवाद डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. परिसंवादात वक्ते म्हणून श्रृतीश्री वडगबाळकर, धनंजय गांगळ, श्रीमंत माने, डॉ. विलास साळुंके, मयूर देवकर यांचा सहभाग अपेक्षित आहे. दुपारी साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड – डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये वृषाली देशपांडे, डॉ. भगवान कारे, डॉ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफ़गाण, प्रा. भास्कर ढोके यांचा सहभाग असेल. नाशिक जिल्हा स्थापनेला 150 वर्ष झाली आहेत. या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.संमेलनाचा समारोप रविवार, 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होईल. समारोपानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Name of Amitabh Bachchan, Gulzar, Akhtar, Ashatai as the inaugural speaker of All India Marathi Sahitya Sammelan)

इतर बातम्याः

हेल्मेटशिवाय प्रवेश नाही, नाशिकमध्ये आजपासून अंमलबजावणी; अन्यथा कार्यालय प्रमुखावर कारवाई

एसटी आंदोलनाला वाढते बळः नाशिकसह येवला, मनमाड, मालेगाव, नांदगावमधील कर्मचारी संपावर

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.