Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | काँग्रेसचे आमदार नाराज, थेट हायकमांडला भेटणार; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हायकमांडकडे जाण्यात काहीही गैर नाही. कोणताही आमदार नाराज नाही. तशी कोणतीही माहिती माझ्याकडे आलेली नाही, असं पटोले म्हणले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

Nana Patole | काँग्रेसचे आमदार नाराज, थेट हायकमांडला भेटणार; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
NANA PATOLE
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 1:34 PM

मुंबई : राज्यातील काँग्रसेचे आमदार आपल्याच काही मंत्र्यांवर नाराज असल्याचं म्हटलं जातंय. हे आमदार राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी थेट दिल्लीला हायकमांडची भेट घेणार आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हायकमांडकडे जाण्यात काहीही गैर नाही. कोणताही आमदार नाराज नाही. तशी कोणतीही माहिती माझ्याकडे आलेली नाही, असं पटोले म्हणले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदारांनी, कार्यकर्त्यांनी हायकमांडला भेटणं हे चुकीचं नाहीये

“आमदारांनी, कार्यकर्त्यांनी हायकमांडला भेटणं हे चुकीचं नाहीये. मंत्र्यावर ते नाराज आहेत, असं माझ्यापर्यंत तर काही आलेलं नाही. राज्यात काँग्रेस एकजुटीने काम करत आहे. लोकांना काँग्रेसकडून मोठ्या अपेक्षा आहेत. काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाही, असं पटोले म्हणाले.

पंतप्रधानांचा दिलेला दौरा ऐनवळी बदलला

तसेच पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा मुद्द्यावरही भाष्य केलं. “आम्ही दोन पंतप्रधान सुरक्षेच्या अभावी गमावलेले आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेविषयी जो प्रश्न निर्माण झाला त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहतो. त्याकडे राजकारणाने पाहत नाही. मात्र केंद्राच्या गृहमंत्रालयाने पंतप्रधानांचा दिलेला दौरा ऐनवळी बदलण्याचं काम झालं. पंतप्रधानांची गाडी थांबवली गेली तेव्हा भाजपचे लोक त्यांच्याबाजूला उभे होते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. आधीच दोन पंतप्रधान गेलेले आहेत. यामध्ये काँग्रेसचीही हानी झालेली आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यबद्दलचं दु:ख कोणीही विसरू शकत नाही,” असे नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्राचे पोलीस सक्षम, कुठलाही हमला होऊ शकत नाहीत

तसेच जैश-ए-मोहम्मदच्या हस्तकांनी आरएसएसची रेकी केल्याची माहिती यापूर्वी पोलिसांनी दिली होती. त्यावर बोलताना, हा गुप्ततेचा विषय आहे. असा कुठलाही हमला महाराष्ट्रात होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहेत, असे पटोले म्हणाले.

काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंना डावलून हायकमांडची भेट घेणार ?

दरम्यान, नाना पटोले यांनी आमदारांच्या नाराजीची चर्चा फेटाळली असली तरी हे आमदार दिल्लीला आपली नाराजी कळवणार असल्याचं म्हटलं जात आहे. आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे तक्रार करण्याऐवजी थेट दिल्लीत हायकमांडला भेटण्याचं ठरवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पटोले यांच्याकडून नाराजी दूर होण्याची शक्यता नसल्याने हे आमदार दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

इतर बातम्या :

डिझाईनर मास्कवरुन अजितदादांच्या सूचना, काल किशोरीताई म्हणाल्या मला ‘मॅचिंग’ची आवड, आज N95 घातला

Nana Patole | यावेळी परिवर्नाची लहर, भाजप नौटंकीबाज; उत्तर प्रदेशची निवडणूक लढण्यास काँग्रेस तयार- नाना पटोले

bank of baroda recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये 105 पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.