ज्यांना मुलबाळ नाही त्यांना वेदना काय कळणार? नाना पटोले पुन्हा घसरले
विद्यार्थ्यांच्या वेदनांबाबत बोलताना, ज्यांना मुलं बाळं नाही अशा लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाही ,असे सूचक वक्त्यव्य नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केले आहे.
गोंदिया : गेल्या काही दिवसांपूर्वीच मोदींबद्दलच्या (Pm Modi) वक्तव्याने नाना पटोले (Nana Patole) वादात आले होते. त्यानंतर भाजपने राज्यभर नाना पटोलेंविरोधात आंदोलनं केली होती. आता पुन्हा नाना पटोले मोदींचं नाव न घेता घसरले आहेत. रशिया युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी (Indian Students In Ukraine) अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या वेदनांबाबत बोलताना, ज्यांना मुलं बाळं नाही अशा लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाही ,असे सूचक वक्त्यव्य नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केले आहे. युक्रेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून आहेत मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोन वर बोललो, त्यांचे व्हिडियो पाहिले. भारताच्या विदेश मंत्रालयाशी मी अनेकदा बोललो असून त्याच्या कडून कोणतेही प्रतिसाद मिळाले नाही. असा आरोपही पटोलेंनी केला आहे.
पंतप्रधान निवडणुकीत व्यस्त
भाजपवर टीका करताना नाना पटोले म्हणाले, ज्याप्रमाणे कोरोनामध्ये पाच राज्याच्या निवडणुका दुसऱ्या लाटेत आल्या तेव्हा भारताचे प्रधानसेवक आहेत ते प्रचारात व्यस्त होते. आणि दुसरीकडे प्रेतं गंगा नदीत तरंगताना दिसताच त्यांना जाग आली. त्याचप्रमाणे पुन्हा आता पाच राज्यांच्या निवडणुका सुरु झाल्या आणि या निवडणुकामध्येच युक्रेनमध्ये युद्ध सुरु होणार होते असे रशियाच्या माध्यमातून सगळीकडे अल्टिमेट दिले जात होते. तेव्हाही भारताचे प्रधान सेवक निवडणुकीत व्यस्त होते. मात्र युद्धा आधीच युक्रेन मध्ये असलेल्या बाकी देशांच्या विध्यार्थाना त्यांच्या देशांनी त्यांना स्वदेशात घेऊन जाण्याची सोय केली असल्याचे तिथे अडकलेल्या विध्यार्थानी सांगितले आहे. मात्र आपल्या देशातून कुठली मदत आपल्या देशातील युक्रेन मध्ये अडकलेल्या विध्यार्थाना मिळालेली नाही . असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रदानांना जाग यावी
त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्या देशातील दुतावाससुद्धा विध्यार्थाचा फोन उचलत नाही. केंद्र सरकार म्हणते तुम्ही काही गडबड करू नका आम्ही सगळं बघून घेऊ .मात्र आज ज्यांची मुलं त्याठिकाणी शिकत आहेत, त्यांच्या कुटूंबियांना काय वेदना होत असतील, ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना काय ते कळणार नाही. असा टोला त्यांनी लगावला आहे. केंद्रातील सरकार आपल्या देशातील लोक युक्रेन मधून आणण्यात कमी पडले आहे. हे सत्य आहे आणि त्यांनी हे मान्य केलं पाहिजे, असेही ते म्हणाले. तर जी बंकरखाली मुलं आहेत. त्या ठिकाणाच्या मुलींचे व्हिडीओ पहिले तर त्या मुलीनं सांगितलं की या ठिकाणाहून मुली गायब होत आहेत .हे सगळं बघून देशाचे पंतप्रधान जागे व्हावेत. सगळ्या मुलांना देशात परत आणले पाहिजे अशी सदबुद्धी त्यांना मिळो अशी आशा मी करीत असल्याचे नाना पाटोले म्हणाले आहेत.
नवीनचा मृतदेह शक्य तितक्या लवकर भारतात आणू, परराष्ट्र मंत्रालयाकडून नवीनच्या कुटुंबीयांचं सांत्वन