नाना पटोलेंच्या पत्रामुळे वादाची ठिणगी, मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना बसला उद्धव ठाकरेंच्या नाराजीचा फटका
uddhav thackeray and nana patole: उद्धव ठाकरे या पत्रामुळे कमालीचे नाराज झाले आहे. यापुढे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत कोणतीही चर्चा करायची नाही? असा मानस त्यांनी पक्षातील नेत्यांपुढे बोलून दाखवला. उद्धव ठाकरे यांच्या नाराजीचा सामना मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना करावा लागला.
uddhav thackeray and nana patole: महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळ सुटण्याऐवजी वाढत जात आहे. शिवसेना उबाठाने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत काँग्रेसने दावा केलेल्या जागांचा समावेश आहे. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. शरद पवार यांच्याकडेही गाऱ्हाणे मांडले. या पत्रामुळे महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे या पत्रामुळे कमालीचे नाराज झाले आहे. त्यांच्या या नाराजीचा फटका मातोश्रीवर चर्चेसाठी येणाऱ्या इतर काँग्रेस नेत्यांना बसला आहे.
काय आहे वाद
महाविकास आघाडीचा जागा वाटपचा घोळ सुरुच असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेसने दावा केलेल्या १२ जागांचा समावेश आहे. त्या १२ जागा मुंबई आणि विदर्भातील आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पत्र लिहिले. जागा वाटपच्या चर्चेत या जागा कोणी लढवायच्या याबाबत निर्णय झाला नाही. त्यानंतर शिवसेना उबाठाने परस्पर उमदेवार जाहीर केले. ते योग्य नाही, असा आशयाचा मजकूर या पत्रात आहे.
उद्धव ठाकरे यांची नाराजी
उद्धव ठाकरे या पत्रामुळे कमालीचे नाराज झाले आहे. यापुढे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत कोणतीही चर्चा करायची नाही? असा मानस त्यांनी पक्षातील नेत्यांपुढे बोलून दाखवला. उद्धव ठाकरे यांच्या नाराजीचा सामना मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना करावा लागला. यापूर्वी उद्धव ठाकरे काही जागा सोडण्यास तयार झाले होते. परंतु या पत्रानंतर त्यांनी माघार न घेण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सहज जागा वाटप झाले होते. परंतु लोकसभेतील यशानंतर काँग्रेस स्वत:ला मोठा भाऊ समजू लागला आहे. शिवसेना उबाठाची शक्ती कमी असल्याचे काँग्रेस नेते म्हणत आहे. त्यामुळे आमची शक्ती कमी आहे तर आमच्याशी आघाडी का करता? असा सवाल उद्धव ठाकरे यांचे नेते करत आहेत.