उद्या देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेर काँग्रेसचं आंदोलन, भाजपचा इशारा काय?

पंतप्रधान मोदी  छत्रपती यांचा अपमान करत होते. तेव्हा भाजपचे सदस्य बाक वाजवत होते, याचा निषेध म्हणून फडणवीस यांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

उद्या देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेर काँग्रेसचं आंदोलन, भाजपचा इशारा काय?
फडणवीसांची भूमिका तपासा - पटोले
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 7:07 PM

मुंबई : पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Speech) संसदेत केलेल्या टीकेवरून राज्यातली काँग्रेस (Congress) आता चांगलीच आक्रमक झाली आहे. rss मध्ये जे मोठे झाले आणि पदावर बसले, ही rss ची संस्कृती आहे का? ही हिंदुस्थानची संस्कृती आहे का? आसामच्या मुख्यमंत्री यांनी राहील गांधींबद्दल (Rahul gandhi) बोलले त्यांनी देशाची माफी मागावी. कारण ते देशाच्या आईबद्दल बोलले आहेत. असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. आम्ही हिंसेने उत्तर नाही देणार. पंतप्रधान संसदेत कसे भाषण करतात? त्यांना जनता कधीही माफी करणार नाही. लोकांना तोडण्याचे काम भाजप नेहमी करत आहे. पंतप्रधान मोदी  छत्रपती यांचा अपमान करत होते. तेव्हा भाजपचे सदस्य बाक वाजवत होते, याचा निषेध म्हणून फडणवीस यांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा समाजात भाजपा फूट पाडते, सगळ्या निवडणूक भाजपा हरत आहे. असा टोलाही त्यांनी लगवाला.

नमस्ते ट्रम्पमुळे कोरोना पसरला

कोरोनात देशाच्या सीमा बंद करा अशी मागणी राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी केली. मात्र नियम बाजूला सारून नमस्ते ट्रम्प आयोजित केले गेले, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सभा घेत पंतप्रधानांनी कोरोना पसरवला, असा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपला सत्तेचा मानसिक रोग झाला आहे, पहाटेच सरकार पडलं तेव्हापासून भाजपचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे सतत असे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

प्रसाद लाड यांच्याकडून प्रतिआव्हान

भाजपकडूनही काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. पटोले यांच्या इशाऱ्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिआव्हान दिलं आहे. आमदार प्रसाद लाड यांनी तर नाना पटोले यांचा थेट एकेरी उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येऊनच दाखवा, असं थेट आव्हान दिलं आहे. “नाना, तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. तू उद्या सकाळी 10 वाजता येऊनच दाखव, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजप कार्यकर्ते नाही. सागरवर तू ये, पाहतो तू कसा परत जातो ते”, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंना आव्हान दिलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना लाड यांनी पटोले यांचा एकेरी उल्लेख टाळला आहे.

यूपी, बिहारचा मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री का ठरवू शकत नाही?; जितेंद्र आव्हाडांचा सवाल

Video : ‘नाना.. हिंमत असेल तर सागर बंगल्यावर येऊन दाखव’, प्रसाद लाड यांच्याकडून एकेरी उल्लेख, पटोलेंना थेट आव्हान

‘शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नसतील तर गप्प बसून चालणार नाही’, राजू शेट्टींनी महाविकास आघाडीविरोधात दंड थोपटले?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.