सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं, आता सासूबाईंविरोधात सूनेचा शड्डू

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Nanded Gram Panchayat Election) सासू-सून एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत (Mother in law vs Daughter in law)

सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं, आता सासूबाईंविरोधात सूनेचा शड्डू
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:01 PM

नांदेड : सासू-सुनेचं नातं म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असं म्हटलं जातं. विळा-भोपळ्याप्रमाणे असलेली ही जोडी निवडणुकांच्या मैदानातही एकमेकींविरोधात उतरली आहे. नांदेड जिल्ह्यात दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रेखा दादजवार आणि संगीता दादजवार या सासू-सूनेची जोडी राजकीय रिंगणात एकमेकींना टफ फाईट देणार आहे. (Nanded Dabhad Gram Panchayat election Mother in law contest against Daughter in law)

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सासू-सून एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. खरंतर दोघींनी सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं होतं, मात्र आता सासूबाई रेखा दादजवार यांच्याविरोधात सूनबाई संगीता निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे दाभड ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.

विशेष म्हणजे मागच्या टर्ममध्ये या दोघींनी अडीच अडीच वर्ष सरपंच पद भूषवले होते. वीज, पाणी, शाळेसाठी कुंपण अशी अनेक कामं केली, आता पुन्हा संधी मिळाली, तर काम करण्याची इच्छा असल्याचे सूनबाईंनी सांगितलं आहे.

सासूबाई सध्या कामानिमित्त पुण्याला गेल्या आहेत, परंतु त्यांचाही प्रचार जोरात सुरु आहे. सासू-सुनेच्या या लढाईत कोण वरचढ ठरतं, याची उत्सुकता अख्ख्या गावाला लागली आहे.

सासरे विरुद्ध सूनही मुकाबला

अर्धापुर तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन पॅनल उतरल्याने रंगत आली आहे. विशेष म्हणजे या गावात काका विरोधात पुतण्या आणि सुनेविरोधात सासरा निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आंबेगावची ग्रामपंचायत निवडणूक जिल्ह्यात चर्चेत आली आहे.

पूर्वी या गावावर काँग्रेसचे वर्चस्व होते, मात्र आता काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. तर युवा शक्ती ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून अमोल डोंगरे यांनी सर्व जागेवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आंबेगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

सायाळ ग्रामपंचायत : भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ

नांदेड तालुक्यातील सायाळ ग्रामपंचायतीवर काँग्रेसची दीर्घकाळ सत्ता राहिली आहे. मात्र आता सायाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नऊ सदस्य संख्या असलेल्या सायाळमध्ये सत्तेसाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. अवघे अठराशे मतदार असलेल्या या गावाच्या निवडणुकीत मतदारांची आतापासून बडदास्त ठेवण्यात येत आहे.

दर्यापूरची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

नांदेड तालुक्यातील दर्यापूर इथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधपणे काढण्याचे जाहीर केलं आहे. दर्यापूर या गावाने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जोपासली आहे. गावात बहुसंख्य असणाऱ्या मराठा समाजाने वादविवाद टाळण्यासाठी ही प्रथा जोपासली आहे. या गावाची लोकसंख्या 740 असून गावकऱ्यांनी एकोपा आणि बंधुभाव कायमस्वरुपी जपला आहे. त्यातून जिल्ह्यात एक चांगले गाव म्हणून दर्यापूर गावाने आपली ओळख निर्माण केली आहे.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा शड्डू, नांदेडचं चित्र काय?

40 वर्ष सत्ता राखणारा नेता हरपला, नांदेडमधील ग्रामपंचायतीत आता भाजप vs भाजप

(Nanded Dabhad Gram Panchayat election Mother in law contest against Daughter in law)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.