AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | नांदेडहून मुंबई, दिल्ली, पुण्यासाठी लवकरच विमानसेवा, सचखंड एक्सप्रेसचा ताण कमी होणार, केंद्रीय मंत्र्यांचं काय आश्वासन?

नांदेड हे एमबीबीएस आणि आयआयटीचे प्रवेशद्वार ठरत आहे. येथे खाजगी शिकवणीसाठी मुंबई पुणे यासह दिल्ली आणि देशातील विविध कानाकोपऱ्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत.

Nanded | नांदेडहून मुंबई, दिल्ली, पुण्यासाठी लवकरच विमानसेवा, सचखंड एक्सप्रेसचा ताण कमी होणार, केंद्रीय मंत्र्यांचं काय आश्वासन?
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 7:05 PM

नांदेड : नांदेड येथून नांदेड – मुंबई, नांदेड- दिल्ली आणि नांदेड पुणे ही विमानसेवा लवकरच सुरु केली जाईल, असं आश्वासन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादीत्य सिंधिया (Jyotiraditya Sindhiya) यांनी दिलं आहे. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह खासदारांच्या शिष्टमंडळाने सिंधिया यांची भेट घेतली होती. आता सिंधिया यांनी विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल असं म्हटलं आहे. शीख धर्मीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचखंड गुरुद्वारा (Sachkhand) येथे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे. शिवाय जगातील कानाकोपऱ्यातून हुजूर साहेब सचखंड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्येही लक्षणे वाढ झाली आहे. नांदेड शहराचा (Nanded city) झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे नांदेडला राष्ट्रीय पातळीवर जोडण्यासाठी ही विमान सेवा अत्यावश्यक आहे. नांदेड – पुणे , नांदेड – दिल्ली आणि नांदेड – मुंबई या तिन्ही मार्गावर नवीन विमानसेवा सुरू करावी अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव ,लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे ,हिंगोली चे खासदार हेमंत पाटील, जहीराबाद चे खासदार भीमराव पाटील, मनमाड चे खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन केली होती.

Nanded

‘नांदेडच्या विकासासाठी लाभदायी’

नांदेड शहराचा वाढता विस्तार आणि उद्योग व्यवसायाच्या नवीन वाढीसाठीही विमानसेवा अत्यावश्यक ठरणारी आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे नांदेडला आणि मराठवाड्याला अनेक रेल्वे सेवांचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे . मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. आता विमानसेवा अधिकाधिक दर्जेदार व्हावे आणि नांदेडकरांना मुंबई, पुणे ,दिल्ली येथे तातडीने पोहोचता यावे ,आपली कामे नियोजित वेळेत करता यावीत या अनुषंगाने या विमानसेवा प्राधान्याने सुरू कराव्यात अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या शिष्टमंडळासह केली आहे.

विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त

नांदेड हे एमबीबीएस आणि आयआयटीचे प्रवेशद्वार ठरत आहे. येथे खाजगी शिकवणीसाठी मुंबई पुणे यासह दिल्ली आणि देशातील विविध कानाकोपऱ्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे शैक्षणिक हब ठरत असलेल्या नांदेडला विमानसेवेने जोडणे अत्यावश्यक होत आहे .त्यामुळे नांदेड येथे तातडीने ह्या तिन्ही मार्गावरील विमानसेवा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास दिला आहे . त्यामुळे लवकरच नांदेडकरांना मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे विमानसेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.