लग्नानंतरही भेटण्यासाठी पाठलाग, विवाहितेनं आयुष्य संपवलं, नांदेडमधली धक्कादायक घटना

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आटकळी येथील अश्विनी कपिल पोलकमवाड हिचा गावातील परमेश्वर काळसे हा तरुण सातत्याने पाठलाग करीत होता.

लग्नानंतरही भेटण्यासाठी पाठलाग, विवाहितेनं आयुष्य संपवलं, नांदेडमधली धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 3:06 PM

नांदेडः एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या त्रासाने कंटाळलेल्या विवाहित महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नांदेडमध्ये (Nanded Crime) उघडकीस आली आहे. बिलोली तालुक्यातील (Nanded Biloli) आटकळी गावातील ही दुर्दैवी घटना आहे. गावातील आरोपी परमेश्वर कळसे हा महिलेला एकांतात भेटण्यासाठी दबाव आणत होता. लग्नापूर्वीदेखील हा आरोपी या महिलेवर अश्याच प्रकारे दबाव आणत होता, या महिलेचे लग्न झाले तरी आरोपी सासरी जाऊन तिला त्रास देतच होता. अखेर या सर्वाला वैतागून महिलेने विष प्राशन केले.

लग्नानंतरही तरुणीचा सतत पाठलाग

या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी परमेश्वरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आटकळी येथील अश्विनी कपिल पोलकमवाड हिचा गावातील परमेश्वर काळसे हा तरुण सातत्याने पाठलाग करीत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला एकांतात भेट असे तो म्हणायचा. तू भेटली नाहीस तर तुला खतम करतो, अशी धमकीही द्यायचाय अखेर 28 फेब्रुवारी रोजी या त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी विषप्राशन केले. शहरातील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी संजय बोईनवाड यांच्या तक्रारीवरून परमेश्वर काळसे याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

12 वर्षीय मुलीसोबत चाळे, शिक्षकावर गुन्हा

महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले असतानाच नांदेडमध्ये अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील 12 वर्षीय मुलीसोबत शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे. हा शिक्षक खासगी शिकवणी घेत होता. विद्यार्थिनी म्हणून शिकण्यासाठी आलेल्या मुलीशी या शिक्षकानं गैरवर्तनाचं कृत्य केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या आईने याविरोधात तक्रार दाखल केली असून पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

शिळफाटा-महापे रोडवर आगीचे लोट, भंगाराच्या गोदामाला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Aurangabad | ‘ब्रेक द बायस’ संवादातून शेकडो युवतींना शृंखला तोडण्याची प्रेरणा, महिला दिनानिमित्त औरंगाबादेत स्तुत्य उपक्रम

सोबतच्या महिलांना Happy Women’s Day म्हणताय? जरा थांबा, त्यांना नेमकं काय हवंय, तेही जाणून घ्या!

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.