Nanded | ….तर आमदारकी सोडेन! आमदार Prashant Bamb यांचं बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना ओपन चॅलेंज!
आमदार प्रशांत बंब यांनी 2018 आणि 2019 सालातील बांधकाम विभागाच्या विविध कामांची तक्रार केली होती. त्यापैकी डांबर न वापरताच बिले जोडणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र इतर रस्त्याच्या भ्रष्टाचारा प्रकरणी अद्याप काहीही कारवाई झाली नाही.
नांदेड : राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नांदेड जिल्ह्यातच बांधकाम खात्यात प्रचंड भ्रष्टाचार माजलाय. अशोक चव्हाण यांनी आपल्या मतदार संघातील एकही 100 मीटरचा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे केल्याचे दाखवले तर मी आदरकी सोडेन. एवढंच काय कर आयुष्यात पुन्हा राजकारण (Politics) करणार नाही, असा इशारा आमदार प्रशांत बंब (BJP MLA Prashant Bamb) यांनी दिला आहे. प्रशांत बंब हे औरंगाबादमधील गंगापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार असून त्यांनी नांदेडमधील काही रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आहेत. या भ्रष्टाचारावरून त्यांनी अशोक चव्हाण यांना आज थेट इशारा दिला आहे.
काय म्हणाले आमदार प्रशांत बंब?
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना इशारा देताना आमदार प्रशांत बंब म्हणाले, ‘माझं आव्हान आहे मंत्री महोदयांना. नांदेड जिल्ह्यातील कोणतेही दहा रस्ते त्यांनी निवडावेत. अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवावं. या रस्त्यांमध्ये 50 टक्के निकृष्ट दर्जाची कामं केली आहेत. संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील कोणताही रस्ता 100 टक्के क्वालिटीचा असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन जीवनात राजकारण करणार नाही.’
Nanded | ….तर आमदारकी सोडून देईन! आमदार प्रशांत बंब यांचं मंत्री अशोक चव्हाणांना आव्हान! pic.twitter.com/TF1x87LMNN
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 11, 2022
काय आहे नेमकं प्रकरण?
बांधकाम खात्यातील विविध तक्रारीचे पुरावे देण्यासाठी आमदार प्रशांत बंब आज नांदेडला आले होते. नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात येऊन बंब यांनी कागदपत्रे सादर केली. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यानी बंब यांचा जवाब देखील नोंदवला. गेल्या चार वर्षांपासून बंब हे बांधकाम खात्यातील अनेक तक्रारीचा पाठपुरावा करत आहेत. त्याच अनुषंगाने एसीबीने बंब यांना त्यांच्याकडचे पुरावे सादर करण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे आमदार बंब हे आज नांदेडला येऊन त्यांनी एसीबी कार्यालयात पुरावे सादर केली . यावेळी बंब यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेदेखील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे.
2018-19 मधील भ्रष्टाचार
आमदार प्रशांत बंब यांनी 2018 आणि 2019 सालातील बांधकाम विभागाच्या विविध कामांची तक्रार केली होती. त्यापैकी डांबर न वापरताच बिले जोडणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र इतर रस्त्याच्या भ्रष्टाचारा प्रकरणी अद्याप काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बंब यांनी पाठपुरावा करताच त्यांना त्यांच्याकडच्या पुराव्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार बंब आज स्वतः एसीबीच्या कार्यालयात दाखल होत त्यांनी पुरावे दिले आहेत.
इतर बातम्या-