AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशासाठी मोस्ट वाँटेड, खलिस्तानी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात आलाय का? नांदेड पोलिसांची झोप उडाली, काय आहे प्रकरण?

नांदेड पोलीस गेल्या आठवडाभरापासून हायअलर्टवर आहेत. मागील दोन दिवसांपासून विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात असून अमृतपालच्या वारीस दे पंजाब या संघटनेच्या सदस्यांचीही कसून चौकशी होत आहे.

देशासाठी मोस्ट वाँटेड, खलिस्तानी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात आलाय का? नांदेड पोलिसांची झोप उडाली, काय आहे प्रकरण?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 9:58 AM

राजीव गिरी, नांदेड : पंजाब (Punjab) पोलिस स्टेशनवर शस्त्रधारींच्या हल्ल्यानंतर देशभरात खळबळ माजवून देणारं नाव म्हणजे अमृतपाल सिंग (Amrutpal singh). गेल्या १८ मार्चपासून पंजाबसह देशभरातील पोलिसांसाठी तो मोस्ट वाँटेड आहे. ७ राज्यातील पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहेत. नांदेडमध्येही अमृतपाल सिंग याचे समर्थक आहेत. त्यामुळे अमृतपाल सिंग महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणूनच नांदेड पोलीस गेल्या आठवडाभरापासून हायअलर्टवर आहेत. मागील दोन दिवसांपासून विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात असून अमृतपालच्या वारीस दे पंजाब या संघटनेच्या सदस्यांचीही कसून चौकशी होत आहे.

अमृतपालच्या समर्थकांवर करडी नजर

वारीस दे पंजाब संघटनेच्या विरोधात देशभरात कारवाई सुरु आहे. नांदेडमध्येही अमृतपाल सिंगचे काही समर्थक राहतात. तीर्थयात्रेच्या निमित्ताने ते भूमिगत झाल्याचं म्हटलं जातंय. हे समर्थक नेमक्या कोणत्या तीर्क्षयात्रेवर गेले आहेत, याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तर शहरातील समर्थकांवरही वॉच ठेवला जातोय.

लपण्यासाठी नांदेडमध्ये येऊ शकतो…

पंजाब मधल्या पाहिजे असलेल्या अमृतपाल सिंघच्या बाबतीत कोणत्याही तपास यंत्रणेचा नांदेड पोलिसांना अलर्ट आलेला नाही, मात्र आम्ही स्वतः हुन याबाबतीत काळजी घेण्यात येत असल्याचे नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्पष्ट केलंय. नांदेडमध्ये शीख धर्मीय मोठ्या संख्येने राहतात त्यामुळे अमृतपाल सिंघ नांदेडला लपण्यासाठी येण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे नांदेडमध्ये ये-जा करणाऱ्या मंडळींची तपासणी केल्या जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलय.

रेल्वेस्थानकात प्रवाश्यांची तपासणी

अमृतपालसिंग नांदेडमध्ये लपण्याची शक्यता असल्याने सध्या नांदेडमध्ये येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी करण्यात येतेय. रेल्वेस्थानकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून येजा करणाऱ्या प्रवाशांची रेल्वे पोलीस तपासणी करतायत. मात्र पोलिसांना अद्याप काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही. नांदेडमध्ये यापूर्वी भिंद्रनवाले यांचे पोस्टर झळकले होते, त्यामुळे अमृतपाल प्रकरणी नांदेड पोलीस अलर्ट झाले आहेत.

बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह.
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय...
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय....
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की.
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप.
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?.
नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील... राऊतांवर चित्रा वाघ यांचा निशाणा
नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील... राऊतांवर चित्रा वाघ यांचा निशाणा.