VIDEO | नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, अनेकांचे मोठे नुकसान
नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे गावाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. (Nanded pre-monsoon rain)
नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, लोणावळा, लातूर, सांगली या ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस कोसळत आहे. त्यातच नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे गावाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. (Nanded pre-monsoon rain)
महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास अद्याप काही दिवस बाकी आहे. मात्र तरीही ठिकठिकाणी महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. विशेषतः कामठा शिवारात या पावसाचा जोर अधिकचा होता. या पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झालं आहे.
त्यामुळे गावाला अक्षरश: तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने गावकरी हवालदिल झाले आहेत. तसेच घरातील सगळेच साहित्य पावसात भिजल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. (Nanded pre-monsoon rain)
पाहा व्हिडीओ :