सर्व रेल्वे जागेवरच थांबल्या, एका व्यक्तीने असे काय केले…

railway | नेहमी मेगा ब्लॉकमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचा प्रकार अनेक प्रवाशांनी पाहिला. परंतु भुसावळ ते सुरत दरम्यानची रेल्वे सेवा मंगळवारी एका व्यक्तीमुळे विस्कळीत झाली. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद झाली. त्या व्यक्तीमुळे वीज पुरवठा खंडीत करावा लागला.

सर्व रेल्वे जागेवरच थांबल्या, एका व्यक्तीने असे काय केले...
नंदुरबार रेल्वे स्थानकावर हाय टेन्शन लाईनवर चढला मनोरुग्ण चढला. Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 11:58 AM

गौतम बैसाने, नंदुरबार, दि. 28 नोव्हेंबर 2023 | रेल्वेच्या विकास कामांमुळे अनेक वेळा मेगा ब्लॉक घेतला जातो. मुंबई आणि पुणे रेल्वे स्थानकावर मेगा ब्लॉक घेण्याचा प्रकार अनेकवेळा होतो. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होतात. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मेगा ब्लॉक विकास कामांसाठी घेतला जातो. परंतु नंदुबार रेल्वे स्थानकावर एक वेगळीच घटना घडली आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने रेल्वे प्रवासी वाहतूक ठप्प केली आहे. त्यामुळे रेल्वे जागेवरच थांबल्या आहेत. या प्रकारामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले आहे. हा व्यक्ती मनोरुग्ण आहे. तो रेल्वेच्या हाय टेन्शन लाईनवर तो व्यक्ती चढला आहे. यामुळे वीज पुरवठा खंडीत करावा लागला आणि रेल्वे जागेवरच थांबल्या.

काय झाला नेमका प्रकार

मंगळवारी एक मनोरुग्ण व्यक्ती रेल्वेच्या हाय टेन्शन लाईनवर चढला. यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. भुसावळ ते सुरत दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद झाली. सर्व रेल्वे जागेवरच थांबल्या. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. मनोरुग्णाला हाय टेन्शन लाईनवरून खाली उतरवण्याचे प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु तो मनोरुग्ण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत होती. अखेर एक तासांच्या प्रयत्नानंतर त्याला खाली उतरवण्यात यश आले. त्यानंतर रेल्वेचा वीज पुरवठा पुन्हा सुरु झाला आणि जागेवर थांबलेल्या रेल्वे पुन्हा धावू लागला. परंतु तासभर रेल्वे बंद झाल्यामुळे प्रवाशी अडकून पडले होते. अनेक प्रवाशांचे पुढील नियोजन कोलमळले आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्या मनोरुग्ण व्यक्तीस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

आरपीएफने बंदोबस्त करावा

रेल्वे स्थानकावर अनेकवेळा मनोरुग्ण किंवा रिकामे व्यक्ती फिरत असतात. अनेकांचा मुक्काम रात्री रेल्वे स्थानकावर असतो. यामुळे चोऱ्या होण्याचे प्रकार वाढतात. रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे स्थानकाची कसून चौकशी केली तर पुन्हा अशा घटना घडणार नाही.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.