Video | दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब?; राणेंचा पुन्हा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, प्रदीप भालेकर हा तक्रारी करायचे काम करतो. त्याने ट्वीट केले. ते कशा वृत्तीचे आहेत ते दिसेल. राजकीय सूडबुद्धी किंवा दुष्टबुद्धी असू नये. त्याने ट्वीट केलं. शिवसेनेच्या लोकांनी पुढे करून मला तक्रार करायला सांगितली. तो मला भेटला, पण मी म्हटलं मला तुमच्या लफड्यात पडायचे नाही.

Video | दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब?; राणेंचा पुन्हा हल्लाबोल
नारायण राणे, केंद्रीय मंत्री.
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 12:15 PM

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल करत आपल्या जहाल वाकबाणांनी घायाळ करून सुरू ठेवले आहे. आता त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केलेत. दिशा सालियनवर (Disha Salian) बलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्या (Sushant Singh) इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, आमच्याकडेही काही माहिती आहे. 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. सांगितले काय, तिनं आत्महत्या केली. तिला पार्टीला थांबायला सांगितलं. ती थांबली नाही. त्यानंतर कोण होतं. पोलीस प्रोटेक्शन कुणाला होतं. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचं होतं. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही. त्या इमारतीत राहायची त्यातील ८ जूनची पानं कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल त्यांनी केला.

सुशांतचीही हत्या केली…

राणे म्हणाले, हे सारे सुशांत सिंगला जेव्हा कळलं, तेव्हा तो म्हणाला मै इनको छोडूंगा नही. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले. त्याच्या घरात दिशावरून बाचाबाची झाली. त्यात त्याची हत्या केली गेली. तेव्हा कोणत्या मंत्र्यांची गाडी होती. त्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे गायब कुठे झाले. 13 जूनला गायब झाले. त्याआधी होते. सोसायटीतील लोक सांगतात. ठराविक माणसांची अॅम्ब्युलन्स कशी आली. हॉस्पिटलला त्याला कोणी नेले. याची चौकशी होणार. यात कोणते अधिकारी होते हे ही उघड होणार. तेही माहिती करतील सर्व. रमेश मोरेंची हत्या कुणी केली. का केली कुणी केली. त्यांची कुणाचा संबंध नव्हता. जयंत जाधवची हत्या का झाली. आम्ही काढलं नाही. खोलात जाईल हे आम्हाला माहीत नाही का, असा इशाराही त्यांनी दिला.

आपण कोणाच्या घरावर जात नाही…

राणे म्हणाले की, माझ्या जुहूच्या घरात 17 सप्टेंबर 2009 मध्ये आलो. त्यालाही आता 14 वर्षे झाली. या इमारत नामांकित आर्किटेक्टने 1991च्या डीसी रुलप्रमाणे इमारत बांधली. ओसी आणि सीसी दोन्ही गोष्टी महापालिकेने दिल्या. मी एकही गोष्ट अपूर्ण ठेवली नाही. त्यानंतर एक इंचही बांधकाम केले नाही. काही आवश्यकताच पडली नाही. माझे दोन मुले. त्यांचे पत्नी आणि दोन लहान मुले असे सहा जण राहतो. त्यामुळे या ठिकाणी हॉटेल किंवा कोणताही व्यवसाय चालत नाही. रेसिडेन्स इमारत आहे. शंभर टक्के कायदेशीर इमारत असतानाही सेनेकडून मातोश्रीकडून काही लोकांना सांगून तक्रार केली. पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्याने 15, 16 मध्ये तक्रारी करायच्या. महापालिकेचे सर्व प्लान बघायचे आणि काही इलिगल नाही, असे सांगायचे. हा दुष्टपणा आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. आता शिवसेनेचे प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत. मी सैनिक म्हणणार नाही. प्रमुखच मुळावर आले आहे. त्यांनी मातोश्री दुरुस्त केली. मातोश्री पार्ट टू केली. आम्ही काय म्हणालो.पार्ट टूचे बेकायदेशीर पैसे भरून रेग्युलर केले. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लान माझ्याकडे आहे, पण मी कुणाच्या घरावर किंवा नोकरीवर जात नाही, असा टोलेबाजी त्यांनी केले.

साहेब गृहप्रवेशाला आले असते…

राणे म्हणाले की, प्रदीप भालेकर हा तक्रारी करायचे काम करतो. त्याने ट्वीट केले. ते कशा वृत्तीचे आहेत ते दिसेल. राजकीय सूडबुद्धी किंवा दुष्टबुद्धी असू नये. त्याने ट्वीट केलं. शिवसेनेच्या लोकांनी पुढे करून मला तक्रार करायला सांगितली. तो मला भेटला, पण मी म्हटलं मला तुमच्या लफड्यात पडायचे नाही. शिवसेनेत असताना या घराची सुरुवात केली. साहेबांना सांगितले जुहूला घर घेतोय. साहेबांनी छान म्हटले. ते असते तर गृहप्रवेशाला आले असते.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.