“शाब्बास एकनाथजी! योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, राणेंचं सूचक ट्विट
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नारायण राणे यांनी सूचक ट्विट केलं आहे. "शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता", असं ट्विट राणेंनी केलं आहे.
मुंबई : मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या कुणाच्याही संपर्कात नाहीत. ते भाजपत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
नारायण राणे यांचं ट्विट
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नारायण राणे यांनी सूचक ट्विट केलं आहे. “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, असं ट्विट राणेंनी केलं आहे.
शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 21, 2022
आनंद दिघे कोण आहेत?
आनंद दिघे हे कट्टर शिवसैनिक होते. दिवसेंदिवस आनंद दिघेंचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांच्या नावाला वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं. कारण दिघेंमुळे शिवसेनेत गटबाजी सुरू झाली होती. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते, अशी त्यावेळी ठाण्यात चर्चा होती, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी आनंद दिघे यांच्याविषयी एका वेबसाईटशी बोलताना सांगितली आहे.
आनंद दिघेंचा मृत्यू
24 ऑगस्ट 2001 हा दिवस दिघे कुटुंबावर आणि शिवसेनेवर काळ बनून आला होता. गणोशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. याच दिवशी त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली. डोक्याला मार लागला. अपघातानंतर त्यांना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 26 तारखेला दुपारी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली. संध्याकाळी 7.15 वाजता त्यांना हार्ट अटॅक आला. 7.25 मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला आणि रात्री 10.30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृत्यू गुढ असल्याचं बोललं जातं. त्याचाच आधार घेत नारायण राणेंनी ट्विट केलंय.
निलेश राणे यांनीही ट्विट केलंय. “ठाकरेंचे दिवस फिरले…”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
निलेश राणे यांचं ट्विट
ठाकरेंचे दिवस फिरले…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 21, 2022