अमित शाहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी: चंद्रकांत पाटील
नारायण राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली. | Chandrakant Patil
कणकवली: नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी स्वत:च्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांना कोकणात बोलावले, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. नारायण राणे (Narayan Rane) यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली. कारण अमित शाह अशी व्यक्ती आहेत की. जे पंतप्रधानांना विनंती करु शकतात, सहकाऱ्यांना सूचना देतात आणि कनिष्ठांना आदेश देतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. (Chandrakant Patil in Medical collage inauguration of Narayan Rane)
ते रविवारी नारायण राणे यांच्या कणकवली येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. नारायण राणे हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. नारायण राणे यांनी अमित शाह यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावून एक स्वप्न साकार केले. आता त्यांनी कोकणात रोजगारनिर्मिती करण्यासाठी अमित शाह यांना विनंती करावी, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
‘मुंबईतील चाकरमान्यांसाठी कोकणात रोजगार निर्माण करा’
कोकणातील अनेकजण नोकऱ्यांसाठी मुंबईत जातात. हे लोक मुंबईतील झोपडपट्टीत आनंदाने राहत नाहीत. मात्र, त्यांना नाईलाजाने पोटापाण्यासाठी तेथे राहावे लागते. त्यामुळे नारायण राणे यांनी कोकणात रोजगारनिर्मितीसाठी अमित शाह यांना साकडे घालावे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
नारायण राणे महाराष्ट्राचे दबंग नेते: फडणवीस
महाराष्ट्राचे दबंग नेता म्हणून नारायण राणे यांची ख्याती आहे. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरुन ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणं हा फार धाडसी निर्णय होतं. 650 हॉस्पिटल उभारणं हे खूप आव्हानात्मक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
नारायण राणेंना केंद्रात बढती मिळणार?; अमित शाहांच्या कोकण दौऱ्यामुळे जोरदार चर्चा
राणे अमित शहांना उद्घाटनासाठी भेटले, त्यावेळेस शहा नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर
नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, फारसं लक्ष देऊ नका: शरद पवार
(Chandrakant Patil in Medical collage inauguration of Narayan Rane)