बाटगा जास्त कोडगा असतो, नारायण राणेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर, नारायण राणे हे लाचार नेते
विनायक राऊत यांनी जोरदार टीका करत बाळासाहेब ठाकरे यांचा दाखल देत शिवसेनेन नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले असले तरी ते त्यांना कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचा नेता म्हटले नाही असे सांगत नेता होण्याची त्यांची लायकी नाही म्हणत पत्रकार परिषदेत राणे कुंटुंबीयावर टीका केली.
मुंबईः शिवसेना भवनातील संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वादळी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांची आज पत्रकार परिषद झाली होती. त्यानंतर काही वेळातच शिवसेने (Shivsena) पुन्हा एक पत्रकार परिषद घेत नारायण राणे (Narayan Rane) यांचे वाभाडे काढले. या विनायक राऊत यांनी जोरदार टीका करत बाळासाहेब ठाकरे यांचा दाखल देत शिवसेनेन नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले असले तरी ते त्यांना कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचा नेता म्हटले नाही असे सांगत नेता होण्याची त्यांची लायकी नाही म्हणत पत्रकार परिषदेत राणे कुंटुंबीयावर टीका केली.
खासदार राऊत शिवसेनेचे आमचे नेते असून त्यांना भाजप आणि नारायण राणे यांनी ईडीच्या माध्यमातून जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला असला तरी ते कोणत्याही कारणाने डगमगले नाहीत. त्यांनी निधड्या छातीने पत्रकार परिषद घेत घोटाळ्याविषयी सगळे खुलासे केले.
सगळ्या पक्षांशी बेईमान
सगळ्या पक्षांमध्ये जाऊन आणि आता भाजपमध्ये पाठीमागच्या दाराने जाऊन चोरपावलांनी दिल्लीहून परतणाऱ्यांनी सगळ्या पक्षांशी बेईमान केली असल्याची टीकाही विनायक राऊत यांनी केली. नारायण राणे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, नारायण राणेंविषयी बोलताना एक म्हण आठवते म्हणत त्यांनी बाटगा जास्त कोडगा असतो असे म्हणत त्यांनी नारायण राणेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले सगळ्या पक्षांतून जाणारे नारायण राणे हे लाचार नेते आहेत त्यामुळे ते आक्रस्ताळे करत आहेत आणि त्यांचा आता सगळ्या प्रकारचा आक्रस्ताळे पणा करुन झाला आहे असे सांगत त्यांच्या राजकीय वाटचालीवर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे:आदर्श मुख्यमंत्री
नारायण राणे लाचारीने जरी बोलत असले तरी आणि त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असले तरी कोरोनाच्या काळात संपूर्ण देशवासियांनी उद्धव ठाकरे यांनी आदर्श मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव केला असल्याचे सांगितले. नारायण राणे ज्यांच्या बरोबरीने आज आमच्या टीका करत आहेत त्या किरीट सोमय्यांनी आदरणीय राणे यांच्या विरोधात आरोपांची मालिका चालवली होती. त्यावेळी नारायणे राणेंच्या पत्नीच्या नावे असणारी हॉटेल्स, मायनिंग आणि जमीन व्यवहाराबाबत अनेक घोटाळ्याच्या टीका करत राणे यांच्या वर शंभर कंपन्या तयार केल्याचा आरोप सोमय्यांनीच केला होता असेही या पत्रकार परिषदेत सांगितले.
संबंधित बातम्या
Video| तर कदाचित तू नसतास, नारायण राणेंचे राऊतांवर गंभीर आरोप, कुंडली मांडण्याची धमकी