संजय राऊतांचा आधी अमित शहांना खोचक सल्ला, आता राणे म्हणतात तुम्ही काश्मीरला जाऊन तरी दाखवा
केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक झाले आहेत. अमित शहा किमान काश्मीरला जातात. राऊत यांनी एकदा जाऊन तरी दाखवावे. यांची काय गिनती आहे, असे खोचक टीका राणे यांनी राऊत यांच्यावर केली.
मुंबई : जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवस तिकडेच राहावे अशी टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांच्या याच खोचक प्रतिक्रियेनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक झाले आहेत. अमित शहा किमान काश्मीरला जातात. राऊत यांनी एकदा जाऊन तरी दाखवावे. यांची काय गिनती आहे, असे खोचक टीका राणे यांनी राऊत यांच्यावर केली.
अमित शहा किमान काश्मीरला जातात
संजय राऊत यांना हिंदुत्व कळलेले नाही. म्हणून शिकवायची वेळ आली आहे. काही लोकांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. अमित शहा किमान काश्मीरला जातात. संजय राऊत यांनी जाऊन तरी दाखवावे. यांची काय गिनती आहे. यांचे राज्यात सरकार असून ते काय करत आहेत. आताचे राज्याचे उद्योगमंत्री जमिनी विकत आहेत,” असे नारायण राणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी
तसेच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी. आपले कर्तव्य काय आहेत हे आधी समजून घ्यावे. अडीच वर्षे झाली यांना एबीसीडी कळलेली नाही. कायद्यात नसतात त्या गोष्टी ठाकरे सरकार बोलत आहे,” असे नारायण राणे म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मिर दौऱ्यावर आहेत. त्याबाबत विचारलं असता राऊत यांनी अमित शाहांनी काही दिवस काश्मिरमध्येच राहावं, अशी टिप्पणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काश्मिर दौऱ्यावर आहेत, असं एका पत्रकारानं म्हटलं. त्यावर संजय राऊत यांनी लगेच ‘चांगली गोष्ट आहे. त्यांनी तिथेच राहावं काही दिवस. अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, गुलमर्ग या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवाद सुरु आहे. देशाचे गृहमंत्री तिकडे जाऊन थांबले तिकडे जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना, आर्मीला, पोलिसांना पाठबळ मिळेल’, असे राऊत म्हणाले.
केंद्रीय सरकारने तातडीने पावले उचललीच पाहिजेत
दरम्यान बांगलादेशात गेले आठ-दहा दिवस हिंदू धर्मीयांवर हल्ले करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून केंद्र सरकारने योग्य पाउल उचलण्याची मागणी 21 ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. “ज्या बांगलादेशची हिंदुस्थानने पाकिस्तानच्या राक्षसी अत्याचारांतून सुटका केली आणि ‘पूर्व पाकिस्तान’ हे नाव कायमचे बदलून ‘बांगलादेश’ नावाचे नवे बाळ जन्माला घातले, त्या भारताचे आणि हिंदू धर्मीयांचे बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी असे पांग फेडावेत, याला काय म्हणावे? हिंदूंची हत्याकांडे घडवूनभारताचे उपकाराचे असे पांग फेडावेत, हे संतापजनक आहे. इनफ इज इनफ. केंद्रीय सरकारने तातडीने पावले उचललीच पाहिजेत, अशी मागमी सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आली होती.
इतर बातम्या :
हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा ! सरकारी परिपत्रकात औरंगाबादचं संभाजीनगर होताच इम्तियाज जलील भडकले
नाशिक जिल्ह्यात 734 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; सिन्नर, निफाड सव्वाशेच्या घरातhttps://t.co/Xog3C7zwb5#Nashik |#Corona |#CoronaPatient |#MunicipalCorporation |#HealthDepartment
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2021
(narayan rane slams sanjay raut on criticism of amit shah)