मुख्यमंत्र्यांना अधिवेशनही नकोय आणि कॅबिनेटच्या बैठकाही; नारायण राणेंची घणाघाती टीका
राज्य सरकारने केवळ दोन दिवसांचंच हिवाळी अधिवेशन घेतल्याने त्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. (narayan rane slams uddhav thackeray over maratha reservation issue)
कुडाळ: राज्य सरकारने केवळ दोन दिवसांचंच हिवाळी अधिवेशन घेतल्याने त्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिवेशनही नकोय आणि कॅबिनेटची बैठकही नकोय, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली आहे. (narayan rane slams uddhav thackeray over maratha reservation issue)
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. दोन दिवसांच्या अधिवेशनात तुम्ही कोणते प्रश्न सोडवणार आहात? दोन दिवसांत शोक प्रस्ताव तरी मांडता येतील का? असे खोचक सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांना अधिवेशनही नकोय आणि कॅबिनेटची बैठकही नको आहे, अशी टीका राणे यांनी केली. राज्य आर्थिक संकटात आहे. राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे नेण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक 48,000 मृत्यू झाले आहेत. हे पाप आताच्या सरकारचं आहे. कोरोना काळात या सरकारने काय उपाय योजना केल्या आहेत? राज्याची अत्यंत दयनीय अवस्था करून सोडली आहे, असंही ते म्हणाले.
तर राज्यभर पडसाद उमटतील
यावेळी त्यांनी मराठा आंदोलनाच्या प्रश्नावरूनही सरकारला धारेवर धरले. मराठा आंदोलनाला या सरकारने बळजबरीने दाबण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला तर त्याचे दुष्परिणाम राज्यात उमटतील आणि त्याला हे सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. (narayan rane slams uddhav thackeray over maratha reservation issue)
मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडू नये म्हणूनच दोन दिवसांचं अधिवेशन
विरोधी पक्षाने मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात मांडू नये म्हणून दोन दिवसाचं अधिवेशन घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेल्या कृषी विधेयकाला विरोधी पक्ष विरोध करून शेतकऱ्यांच्या भावना भडकवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. (narayan rane slams uddhav thackeray over maratha reservation issue)
Video | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 14 December 2020https://t.co/yZAvaNX68j#Newsupdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020
संबंधित बातम्या:
LIVE UPDATES : महाराष्ट्रातील घडामोडी लाईव्ह
मराठा आंदोलक आक्रमक, सीएसटी परिसरात ठिय्या, पोलिसांसोबत झटापट; कोण काय म्हणालं वाचा!
मराठा आणि ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; महाज्योती, सारथीसाठी कोट्यवधींची तरतूद
(narayan rane slams uddhav thackeray over maratha reservation issue)