दिशा सालियन प्रकरणी नारायण राणे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा, म्हणाले, आदित्य ठाकरे यांना…
दिशा सालियन ही महाराष्ट्रातील मुलगी आहे. तिच्यावर तू अत्याचार केला आहेत. हत्या केली आहे. तू तिथं उपस्थित होता.
मुंबई : दिशा सालियन प्रकरणी नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दिशा सालियन सुशांत सिंग प्रकरणी आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असं नारायण राणे यांनी म्हंटलंय. राज्यात शिंदे-भाजपचं सरकार आहे. आदित्य ठाकरे यांना सोडणार नाही. असंदेखील नारायण राणे यांनी म्हंटलंय. ते म्हणाले, आदित्य राणे काय बोलतो. आताच दिशा सालियन प्रकरणी त्याचं नाव आहे. त्यामुळं तो चवताळला आहे. तो आज आतमध्ये जाणार की, उद्या जाणार जाणार. तुला आतमध्ये पाठविणार. सोडणार नाही.
दिशा सालियन ही महाराष्ट्रातील मुलगी आहे. तिच्यावर तू अत्याचार केला आहेत. हत्या केली आहे. तू तिथं उपस्थित होता. त्यामुळं तुला सोडणार नाही. सत्ता आता भाजप आणि शिंदे गटाची आहे. एवढं लक्षात ठेवं. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असं मोठं वक्तव्य नारायण राणे यांनी केलंय.
आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ आता ठाकरे गटाची फौज नागपुरात येणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई आज रात्री उशिरा मुंबईहून नागपुरात येणार आहेत. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आदित्य ठाकरे यांना पाठबळ द्यावं. नैतिक पाठबळ त्यांच्याकडं असावं. यासाठी ठाकरे गटाची फौज मुंबईतून नागपुरात दाखल होतेय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे नागपुरात येत आहेत. आज रात्री उशिरा ते मुंबईहून नागपुरात दाखल होत आहेत.