उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणेंच्या भाषणातला दावा खरा की खोटा?

ईदसाठी परवानगी नसेल तर दिवाळीच्या कंदिलला परवानगी देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं नारायण राणेंनी दावा केलाय. त्यांचा हा दावा खरा आहे की खोटा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये कोणत्या शब्दावरुन दावा-प्रतिदावा रंगतोय. पाहूयात

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणेंच्या भाषणातला दावा खरा की खोटा?
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 10:33 PM

बकरी ईदला परवानगी द्यायची नसेल तर दिवाळीचे कंदिल उतरवा. असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे हयात असते तर गोळ्या घातल्या असत्या. असं विधान भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंनी केलं आहे. मात्र राणेंनी दिलेलं उदाहरण ही धादांत फेक बातमी असल्याचं उत्तर सुषमा अंधारे यांनी दिलंय. मात्र नारायण राणेंचा दावा खरा आहे की खोटा., यासाठी आम्ही काही किवर्ड सर्च केले असता., नारायण राणेंनी दिलेल्या बातमीचा दाखला साफ खोटा असल्याचं समोर आलंय.

विशेष म्हणजे सोसायटींमध्ये सार्वजनिक कुर्बाणी नाही, तर दिवाळीत लाईटिंगही नको या शीर्षकाच्या बातमीची पोस्ट नारायण राणेंचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणेंनी शेअर केल्याचं दिसलं. जिहादी हृदयसम्राट म्हणून त्यावर नितेश राणेंनी कॅप्शनही दिलंय. दैनिक लोकवार्ताच्या नावानं ही बातमी पसरवण्यात आली. मुळात ही घटना तळोजातल्या एका सोसायटीतली होती. बातमीचं शीर्षक आणि आतला मजकूर यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे न्यूजचेकरनं उद्दव ठाकरे असं म्हणाल्याचा दावा स्पष्टपणे खोटा ठऱवून संबंधित बातमीला फेक ठरवलं आहे.

काल राज ठाकरेंनी देखील केलेला एक दावाही चर्चेत आलाय. मविआ काळात काँग्रेस-राष्ट्रवादीला घाबरुन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढचं हिंदूहृदयसम्राट नाव काढून टाकलं असा राज ठाकरे म्हणाले. पण उद्धव ठाकरेंनी ते हटवण्याचे आदेश कुठे दिले नेमकं कुठून नाव हटवण्यात आलं. याचा तपशील अद्याप मिळालेला नाही.

शिवसेनेचं एक उर्दू कॅलेंडर प्रकाशित झालेलं होतं, गुगलवर उपलब्ध असलेल्या एका फोटोत बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे जनाब नाव आहे. मात्र उर्दू किंवा मुस्लिम धर्मियांच्या अनेक कार्यक्रमात सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या नावापुढे जनाब उल्लेख होतो. यावर तेव्हा ठाकरे गटात असणाऱ्या मनिषा कायंदेंनी केलेलं ट्विट व्हायरल झालंय., यात फडणवीस, शेलार, सोमय्यांच्या नावापुढे जनाब. तर भाजपच्या पूजन महाजनांच्या नावापुढे मोहतरमा पूनम महाजन असा उल्लेख आहे.

याशिवाय मुंबईत मविआ काळात बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि मविआ नेत्यांच्या उपस्थितीत अनावरण झालं होतं. त्यावेळी बाळासाहेबांच्या नावाआधी असलेल्या हिंदूहृदयसम्राट नावाचा व्हिडीओ ठाकरे समर्थकांनी पोस्ट करुन मनसेला उत्तर दिलंय.

याआधी वक्फ बोर्डासंदर्भात दैनिक लोकमच्या नावानं प्रकाशित झालेल्या बातमीही वादात आली होती. त्या बातमीला सत्य मानून मनसे नेते प्रकाश महाजनांनी ठाकरे गटावर प्रहार केले होते., मात्र नंतर ती बातमी देखील फेक असून मॉर्फ करुन पसरवण्यात आल्याचं समोर आलं होतं.

Non Stop LIVE Update
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'.
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले...
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले....
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर.
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका.
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.