Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘निष्ठावान आणि वैभव नाईक यांचं समीकरण कसं जमाणार?’ नारायण राणेंनी पुन्हा डिवचलं

नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.

'निष्ठावान आणि वैभव नाईक यांचं समीकरण कसं जमाणार?' नारायण राणेंनी पुन्हा डिवचलं
नारायण राणे आणि वैभव नाईक
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 6:08 PM

भाजप नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विरोधी पक्षांचे उमेदवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते प्रचारसभेत बोलत होते. महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार करावा लागेल अशी परिस्थिती नाही, जिल्ह्यातील तीनही उमेदवार विजयी होणार, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येता कामा नये, विरोधी पक्षातील तीनही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त  झालं पाहिजे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे? 

नारायण राणे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार करावा लागेल अशी परिस्थिती नाही, जिल्ह्यातील तीनही उमेदवार विजयी होणार, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येता कामा नये, विरोधी पक्षातील तीनही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त  झालं पाहिजे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आमच्या तीनही जागा जिंकणार म्हणजे जिंकणार सगळे मोठे प्रकल्प मी सुरू केले, रस्ते ब्रिज मी सुरू केले. काही बाकी होतं ते रवींद्र चव्हाण यांनी पूर्ण केलं. सगळी काम आमची आहेत, असा दावाही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. ते कुडाळचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. निष्ठावान आणि वैभव नाईक यांचं समीकरण कसं जमाणार? एक दोन वेळा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर वैभव नाईक आणि परशुराम उपरकर मला दिसले होते, वैभवला प्रवेश करायचा होता मी विरोध केला. सगळीकडे माझ्यावर टीका करतात, उमेदवार राहिले बाजूला. वैभव नाईक आमच्या पालकमंत्र्याजवळ निधी मागायला जायचे मात्र आमचे मंत्री दिलदार आहेत, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.  दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राजन तेली आणि संदेश पारकर यांच्यावर देखील जोरदार टीका केली.

'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.
फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी
फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी.
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा.