नारायणगाव बायपासचं काम पूर्ण, पुणे-नाशिक प्रवास होणार सुस्साट, गडकरींची ट्विट करत माहिती

नारायणगावातून जाणारा पुणे बायपास हा पुणे ते नाशिकदरम्यानचा प्रवास सुखकर करेल. आता कृषी उत्पादने मुंबई-पुणे मार्केटमध्ये सहज पोहोचतील, असंही नितीन गडकरी ट्विट करत म्हणालेत.

नारायणगाव बायपासचं काम पूर्ण, पुणे-नाशिक प्रवास होणार सुस्साट, गडकरींची ट्विट करत माहिती
Nitin Gadkari
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 10:42 PM

पुणेः देशभरात रस्ते निर्मितीचा चालना मिळत असून, अनेक ठिकाणी वाहतुकीला सुसज्ज असे महामार्ग बनवण्यात आलेत. विशेष म्हणजे हे सर्व केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात होत आहे. आता पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ताही तयार झाला असून, त्याचे फोटोही नितीन गडकरींनी (Nitin Gadkari)ट्विटरवर शेअर केलेत. नारायणगावातून जाणारा पुणे बायपास हा पुणे ते नाशिकदरम्यानचा प्रवास सुखकर करेल. आता कृषी उत्पादने मुंबई-पुणे मार्केटमध्ये सहज पोहोचतील, असंही नितीन गडकरी ट्विट करत म्हणालेत.

नितीन गडकरींच्या कामाचा वेग हा भन्नाट

नितीन गडकरींच्या कामाचा वेग हा भन्नाट आहे. पायाभूत सुविधांमधील मोठ्या बदलांमुळे भारतातील रस्तेही युरोप आणि अमेरिकेसारखे होतील, असंही गडकरींनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्यही प्रचंड चर्चेत आलं होतं. तसेच दिल्ली-मुंबईमधील रस्त्याचे अंतर फक्त 12 तासांचे होणार असून, राज्यातील समृद्धी महामार्गाने मुंबई-नागपूरमधील अंतरही कमी होईल, असंही त्यांनी सांगितलं होतं.

नेमका कसा आहे नारायणगाव बाह्यवळण मार्ग?

पाच वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्ग नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. तसेच खेड ते सिन्नरदरम्यानच्या नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याचं काम 2016 ला सुरू झाले. सुमारे पाच किलोमीटर लांब आणि साठ मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम 2018मध्ये भूसंपादनाच्या कारणास्तव रखडले होते. त्यानंतर आता या बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण झाले असून, पुण्यातून थेट नाशिक आणि मुंबईला पोहोचणे आता सहजशक्य होणार आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.

संबंधित बातम्या

गायीच्या शेणापासून रंग तयार करणार, नितीन गडकरी ब्रँड अ‍ॅम्बेसडर

Narayangaon bypass work completed, Pune-Nashik journey will be faster, nitin Gadkari tweeted information

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.